हॉटेलमध्ये गळफास लावून तरुणीची आत्महत्या

सांताक्रूझ पूर्व येथील एका हॉटेलमध्ये तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
मृत तरुणी ही मूळची बिहारची रहिवाशी होती. ती मध्य प्रदेश येथे शिक्षण घेत होती. नुकतीच ती मुंबईत आली होती. ती सांताक्रूझ येथील एका हॉटेलमध्ये राहत होती. मंगळवारी ती रूमच्या बाहेरदेखील आली नव्हती. रूम चेक आउटसाठी तिच्या रूमवर फोन केला. तिने तो फोन उचलला नाही. त्यानंतर हॉटेलच्या मॅनेजरने तिच्या मोबाईलवर फोन केला. तेव्हा तिचा फोन बंद येत होता. तेथे हॉटेलचे कर्मचारी दरवाजा ठोठावण्यासाठी गेले होते. मात्र दरवाजा आतून बंद होता. हा प्रकार हॉटेलच्या मॅनेजरच्या लक्षात आला. त्याने याची माहिती वाकोला पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा त्या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले.
Comments are closed.