पाकिस्तानात घुसून मोदींनी नक्षलवाद्यांना खतम केले! बावनकुळेंचे अगाध ज्ञान

हिंदुस्थानी सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पहलगाममध्ये भ्याड दहशतवादी हल्ला करणाऱया पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. शंभरच्या वर दहशतवाद्यांना ठार केले आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. मात्र, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, मोदींनी पाकिस्तानात घुसून नक्षलवाद्यांना मारले.

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याडहल्ल्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर मोदींनी पाकिस्तानात घुसून नक्षलवाद्यांना ठार मारले, असे बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कोणताही नक्षली हल्ला हे यापुढे युद्ध समजले जाईल, असा इशाराच मोदींनी पाकिस्तानला दिला आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. सावनेरमध्ये माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी दहशतवाद्यांऐवजी किमान 6 वेळा नक्षलवादी असा उल्लेख केला. त्यांची ही क्लिप सोशल मीडियावर झपाटय़ाने व्हायरल होत आहे.

Comments are closed.