पालिकेच्या अ‍ॅपवर साडेतीन हजार खड्ड्यांच्या तक्रारी!

महानगरपालिकेने खड्ड्यांच्या तकारी नोंदवण्यासाठी सुरू केलेल्या ‘पॉटहोल क्विकफिक्स’ अ‍ॅपवर तब्बल 3 हजार 459 तकारी मुंबईकरांमधून दाखल करण्यात आल्या. या तक्रारीची तातडीने दखल घेत अवघ्या 48 तासांमध्ये हे खड्डे बुजवले आहेत. 9 जूनपासून हे अ‍ॅप मुंबईकरांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आले आहे. खड्डे बुजवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून खड्ड्य़ांची तक्रार करण्यासाठी 9 जूनपासून ‘पॉटहोल क्विकफिक्स’ हे अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपवर आतापर्यंत 3 हजार 451 तकारी प्राप्त झाल्या असून यातील 3 हजार 237 तक्रारी सोडवण्यात आल्या असून 114 तक्रारींवर काम सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज या तक्रारींच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, प्रमुख अभियंता-रस्ते व वाहतूक गिरीश निकम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.