टोरंटो-दिल्ली फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

दिल्लीतील कारस्फोटानंतर देशभरातील तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याचदरम्यान गेल्या दोन दिवसांपासून विमानतळावर बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळत असल्याने सेवेवर परिणाम झालेला दिसून येत आहे. गुरुवारी कॅनडातील टोरंटोहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर त्याची कसून तपासणी करण्यात आली. धमकीनंतर सावधगिरी बाळगत विमान राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सुरक्षितपणे उतरवण्यात आले. लँडिंग होताच सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढून विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू न सापडल्याने सुटकेचा नि:श्वास टाकण्यात आला.

Comments are closed.