ट्रम्प यांच्याकडून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीची घोषणा, शांततेचं नोबेल मिळेल का?
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 10 मे पासून शस्त्रसंधी झालेली आहे. भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला 7 मे रोजी एअर स्ट्राईक करुन घेतला आहे. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. भारतानं ते हल्ले परतवून लावले. भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरुन पोस्ट केली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी संदर्भात माहिती दिल्यानं युद्धाच्या काळात यशस्वी मध्यस्थी करणाऱ्या जागतिक नेत्यांच्या यादीत डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश झाला आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत पाच युद्ध समझोता करार केले आहेत.
ट्रम्प यांनी किती युद्ध थांबवली
डोनाल ड्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी रशिया आणि यूक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबवण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं होतं. त्याची मोठी चर्चा झाली होती. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वॅन्स आणि यूक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात चर्चा झाली. ट्रम्प यांनी हमास आणि इस्त्रायल यांच्यातील युद्ध संपवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. इराण आणि इस्त्रायल यांचे संबंध चांगले नाही, त्यांच्यात देखील वाद होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यात मध्यस्थी केली आहे. हुती बंडखोरांवर करण्यात येणारे हल्ले थांबवण्याचा आदेश ट्रम्प यांनी दिलेला.
शांततेचं नोबेल ट्रम्प यांना मिळेल का?
नोबेल पुरस्कार दरवर्ष भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शांतता, साहित्य, वैद्यकशास्त्र आणि अर्थशास्त्र यामध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्यांना दिला जातो. नोबेल पुरस्कार गेल्या काही वर्षांपासून संयुक्तपणे जाहीर केले जात आहेत. शांततेचा नोबेल एखात्या संस्थेला किंवा संघटनेला दिला जातो. शांततेचं नोबेल ओस्लोमध्ये दिला जातो. याच्या पुरस्कारार्थीची निवड वेगवेगळ्या संस्था करतात. कोणताही व्यक्ती शांततेच्या पुरस्कारासाठी अर्ज करु शकत नाही. या पुरस्कारासाठी इनविटेशन द्वारे नॉमिनेट केलं जातं. योग्य नॉमिनेटर याचं नॉमिनेशन देतात. डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल द्यायचा की नाही यांची घोषणा नोबेल पुरस्कार देणारी द नॉर्वेजियन ग्लोबल कमिटी ठरवेल.
नोबेल पुरस्कार कसा सुरु झाला?
नोबेल पुरस्कार स्वीडनचे वैज्ञानिक अल्फ्रेड बर्नाड यांच्या स्मरणार्थ दिला जातो. डिसेंबह 1896 मध्ये त्यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा ट्रस्टसाठी राखी ठेवले होते. त्यांची इच्छा होती की दरवर्षी मानवजातीच्या कल्यणासाठी काम करतात त्यांना सन्मानित केलं जावं. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडनच्या बँकेत असून त्यातून मिळणाऱ्या वाजावर नोबेल फाऊंडेशन द्वारे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना नोबेल पुरस्कार मिळतो.
अधिक पाहा..
Comments are closed.