मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसारा-कल्याण मार्गावरील लोकल एक ते दीड तास उशिराने

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या कसारा-कल्याण मार्गावरील वाहतुकीवर शनिवारी पहाटे मोठा परिणाम झाला. आसनगाव ते खडवली स्थानकांदरम्यान अप मार्गावरील वीज पुरवठा बंद पडल्याने रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. परिणामी, या मार्गावरील लोकल सेवा १ ते दीड तास उशिराने धावू लागल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ४.२५ वाजता सुटलेली एक लोकल तब्बल ५.४५ वाजेपर्यंत मार्गातच खोळंबून राहिली. वीज पुरवठ्यातील बिघाडामुळे अनेक लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

रेल्वे प्रवासी संघटनेने या घटनेची माहिती दिली असून, सकाळच्या वेळी कामासाठी आणि अन्य कारणांसाठी घराबाहेर पडलेल्या हजारो प्रवाशांचे हाल झाले. स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसून आले.

Comments are closed.