चॅम्पियन्स ट्रॉफीमधून पाकिस्तानची गच्छंती, लज्जास्पद विक्रमाची नोंद!

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात असे कधी घडले आहे का की यजमान देशाने स्पर्धेतील एकही सामना जिंकलेला नाही? खरं तर, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा यजमान देश पाकिस्तान गट टप्प्यातून बाहेर पडला आहे. त्याहूनही लज्जास्पद गोष्ट म्हणजे त्याचा प्रवास कोणत्याही विजयाशिवाय संपला. गुरुवारी झालेला पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. 60 धावांनी झालेल्या दारुण पराभवातून पाकिस्तानला कोणताही धडा घेता आला नाही. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने पराभव केला. या स्पर्धेत पाकिस्तान संघ कोणत्याही क्षेत्रात मजबूत आहे असे कधीच वाटले नाही. त्यांनी दोन्ही सामने वाईटरित्या गमावले. यजमान संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी, पाकिस्तानचा या स्पर्धेतील शेवटचा सामना, बांगलादेशविरुद्ध खेळला जणार होता, तो पण रद्द करण्यात आला. पण ही स्वाभिमानाची आणि लज्जास्पद विक्रम वाचवण्याची लढाई होती.

चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली आवृत्ती 1998 मध्ये बांगलादेशमध्ये खेळवण्यात आली होती. यजमान असूनही, बांगलादेश कसोटी खेळणारा देश नसल्याने तो या स्पर्धेत खेळला नाही.

2000 मध्ये केनियाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवले होते. या हंगामाचे स्वरूप आतापेक्षा वेगळे होते. भारताने प्री-क्वार्टर फायनलमध्ये केनियाला हरवले होते. मुख्य स्पर्धेत केनियाने खेळलेला हा एकमेव सामना होता. पण याआधी केनियाने बाद फेरी खेळली होती, ज्यामध्ये त्यांनी विजय मिळवला होता.

2002 पासून, 6 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यात आल्या आहेत. यजमान देश सामना न जिंकता स्पर्धेचा शेवट करत आहे असे कधीही घडलेले नाही. 2002 मध्ये श्रीलंका यजमान होता. या आवृत्तीत, ते भारतासोबत संयुक्त विजेते बनले.

2004 मध्ये इंग्लंड यजमान देश होता. इंग्लंडने गट फेरीत दोन्ही सामने जिंकले होते. यासह ते अंतिम फेरीत पोहोचले पण अंतिम सामन्यात त्यांना वेस्ट इंडिजने पराभूत केले. 2006 मध्ये भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचा यजमान देश होता. या हंगामात भारत साखळी फेरीतून बाहेर पडला, पण संघाने 3 पैकी 1 सामना जिंकला होता.

यानंतर, 2009 मध्ये दक्षिण आफ्रिका, 2013 आणि 2017 मध्ये इंग्लंड यजमान देश होता. या हंगामातही असे घडले नाही की यजमान देशाने कोणताही सामना जिंकल्याशिवाय स्पर्धेला निरोप दिला. पण मात्र 2025 च्या स्पर्धेत हा इतिहास पाकिस्तानने घडवला.

हेही वाचा-

“विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर पाठवलेल्या मेसेजबाबत धोनीने केला मोठा खुलासा!”
पाकिस्तानच्या यजमानपदाचा फज्जा, स्पर्धेत ना विजय, ना सन्मान; रिकाम्या हाताने घरी!
“दुबईत पाक चाहत्यांची हालत खालावली! कुलदीप यादवच्या उत्तराने शांत”

Comments are closed.