एकनाथ शिंदे जे म्हणाले तेच सांगत अफगाणिस्तानच्या कोचने ऑस्ट्रेलियाला इशारा दिला, म्हणाला…
लाहोर : अफगाणिस्ताननं रोमहर्षक लढतीत इंग्लंडला 8 धावांनी पराभूत केलं. यामुळं इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर गेलं आहे. दुसरीकडे ब गटातील उपांत्य फेरीत कोण पोहोचणार याची चुरस वाढलीय. अफगाणिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 325 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 317 धावांवर बाद झाला. यामुळं इंग्लंड स्पर्धेतून बाहेर गेलं. अफगाणिस्तानच्या या विजयानंतर संघाचा मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रोटनं ऑस्ट्रेलियाला इशारा दिला आहे. जोनाथन ट्रोट यानं आमच्या संघाला आता कुणी हलक्यात घेऊ नये असं म्हटलं.
जोनाथन ट्रोट काय म्हणाला?
अफगाणिस्तानचा मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रोट यानं म्हटलं की,”कोणताही संघ आता अफगाणिस्तानला हलक्यात घेणार नाही. इंग्लंडला पराभूत केल्यानंतर जोनाथन ट्रोट बोलेत होते.
अफगाणिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 325 धावा केल्या. यामध्ये इब्राहिम झरदान यानं 177 धावांची खेळी करत संघाला भक्कम धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर अफगाणिस्ताननं लढाऊ बाणा शेवटपर्यंत सोडला नाही आणि गोलंदाजांनी इंग्लंडचे 10 फलंदाज बाद करत विजय मिळवला. इंग्लंडचा 8 धावांनी पराभव झाला.
अफगाणिस्ताननं आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये बलाढ्य संघांना पराभूत करण्याचा ट्रेंड कायम ठेवला आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला त्यांनी टी 20 वर्ल्ड कपमध्ये पराभूत केलं. वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंडला देखील अफगाणिस्ताननं पराभूत केलं होतं.
जोनाथन ट्रोट यांनी यांनी म्हटलं, संघाच्या खेळाडूंनी सामुदायिक प्रयत्नांनी त्यांच्या बद्दलचं पर्सेप्शन बदललं आहे. वनडे वर्ल्ड कप, टी 20 वर्ल्ड कप आणि आता ते पाहतोय. मी या खेळाडूंबाबत म्हणतो, अफगाणिस्तानला इतर कोणत्याही संघांनी यापुढं हलक्यात घेऊ नये.
जोनाथन ट्रोट पुढं म्हणाले की आम्ही प्रत्येक मॅच स्पर्धात्मक दृष्टिकोनातून खेळतो आणि विजयाच्या अपेक्षेनं मैदानात उतरतो. ऑस्ट्रेलियानं देखील आम्हाला हलक्यात घेऊ नये, असा इशारा ट्रोटनं दिला आहे.
इंग्लंड विरूद्धच्या विजयानंतर जोनाथन ट्रोट यांनी पुढचं लक्ष ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना असल्याचं म्हटलं. संघानं स्पर्धेकडे गांभीर्यानं पाहण्याचा प्रयत्न केला आहे. इंग्लंड विरुद्धचा सामना दोन्ही संघांसाठी करो वा मरो होता. अफगाणिस्ताननं इंग्लंडला त्यांच्या घरी पाठवलं आहे.मात्र, अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियानं पराभूत केल्यास त्यांच्याच विमानातून जाईन, असं जोनाथन ट्रोट म्हणाला.
जेव्हापासून अफगाणिस्तानचा मुख्य प्रशिक्षक झालोय, तेव्हापासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वेळा खेळलो आहे. प्रत्येक सामन्यात आमचं वर्चस्व होतं. खेळाडूंना आज आनंद साजरा करायला सांगितलं. त्यानंतर उद्यापासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचच्या तयारीला लागणार असल्याचं ट्रोट म्हणाला.
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.