इंग्लंड हरल्यानंतर ‘तो’ व्यक्ती मैदानात शिरला, सेलिब्रेशन करणाऱ्या अफगाणिस्तानच्या खेळाडूची कॉल

एएनजी विरुद्ध एएफजी मॅच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जसजशी पुढे जात आहे, तसतसे पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेचे वास्तव समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान एक दहशतवादी त्याच्या नेत्याचे पोस्टर घेऊन मैदानात घुसला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे. काही वृत्तांत असा दावा केला आहे की, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे अपहरण करण्याची प्लान  आखली जात आहे. अशा परिस्थितीत, लाहोरमध्ये अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात मोठी चूक दिसून आली.

खरंतर, अफगाणिस्तान आणि इंग्लंडमधील सामन्यानंतर गद्दाफी क्रिकेट स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाने मैदानात प्रवेश केला. दरम्यान, सुरक्षा कर्मचारीही त्याच्या मागे धावले आणि त्याला ताबडतोब मैदानाबाहेर नेले. पण त्याआधी तो एका अफगाण खेळाडूकडे गेला होता आणि त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेतील अनेक फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये चाहता अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूची कॉलरही पकडली असे दिसून येते. या संपूर्ण घटनेमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये क्रिकेट संघांसमोरील धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दुसऱ्यांदा घडली अशी घटना

क्रिकेटच्या मैदानावर एखाद्या वेड्या चाहत्याने सुरक्षेकडे दुर्लक्ष करून एखाद्या खेळाडूला भेटण्यासाठी मैदानावर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. पण अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात जे घडले ते चित्र काही चांगले नाहीत. जर अशी घटना घडली तर ती चिंतेची बाब आहे. फक्त पाकिस्तानमध्येच नाही, तर जगात कोणत्याही ठिकाणी जर कोणताही चाहता असा प्रकार करत असेल तर ते चुकीचे आहे.

ग्रुप अ मध्ये न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यातही अशीच एक घटना घडली होती. जेव्हा एक चाहता पाकिस्तानच्या एका नेत्याचा फोटो घेऊन रचिन रवींद्रकडे आला. अशा परिस्थितीत, या दुसऱ्या घटनेने चिंता आणखी वाढवली आहे.

अफगाणिस्तानचा 8 धावांनी रोमांचक विजय

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, अफगाणिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये इंग्लंडला 8 धावांनी हरवून इतिहास रचला. या विजयासह अफगाणिस्तानने इंग्लंडला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदाच्या शर्यतीतूनही बाहेर काढले. या स्पर्धेत अफगाणिस्तानचा हा मोठा विजय आहे. अशाप्रकारे, ग्रुप बी मधून उपांत्य फेरी गाठण्याच्या अफगाणिस्तानच्या आशा अजूनही जिवंत आहेत. आयसीसी स्पर्धेत अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभूत करण्याची ही दुसरी वेळ आहे.

हे ही वाचा –

एकनाथ शिंदे जे म्हणाले तेच सांगत अफगाणिस्तानच्या कोचने ऑस्ट्रेलियाला इशारा दिला, म्हणाला, “आम्हाला हलक्यात घेऊ नका”

अधिक पाहा..

Comments are closed.