नाद खुळा! 27 वर्षात क्रिकेटमध्ये न घडलेला पराक्रम यावर्षी घडला!
सध्या जगभरात चॅम्पियन्स ट्रॉफीची चर्चा आहे. त्यातही भारतीय संघ सध्या जरा जास्तच फॉर्मात दिसत आहे. अशातच बुधवारी अफगाणिस्तान संघाने इंग्लंड संघावर शानदार विजय मिळवला. यामुळे ही स्पर्धा अधिकच चर्चेत आली आहे. या स्पर्धेत बुधवारी एक खास विक्रम झाला. त्यामुळे 27 वर्षांच्या स्पर्धेच्या इतिहासत पहिल्यांदाच असा खास विक्रम झाला.
अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्यात दोन शतकी खेळी पहायला मिळाल्या. अफगाणिस्तानच्या इब्राहिम झारदानने 177 धावांची तर इंग्लंडच्या ज्यो रुटने 120 धावांची शानदार खेळी केली. यावर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील या 10व्या व 11व्या नंबरच्या शतकी खेळी ठरल्या. यावर्षी स्पर्धेत चक्क 11 शतके झाली आहेत. (most centuries in a single Champions Trophy edition)
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात आजपर्यंत कधीही 10पेक्षा अधिक वैयक्तिक शतकी खेळी झालेल्या नव्हत्या. परंतू यावेळी तो विक्रम मोडला गेला आहे. यावर्षी बेन डकेट, इब्राहिन झारदान, ज्यो रुट, विराट कोहली, टॉम लेथन, शुबमन गील, जोश इंग्लिस, राचिन रविंद्र, तोहीद ह्रुदय, विल यंग आणि रायल रिकंल्टन्ट यांनी शतकी खेळी केल्या आहेत. ( Most Centuries Champions Trophy )
यापुर्वी 2002 आणि 2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रत्येकी 10 वैयक्तिक शतकी खेळी झाल्या होत्या. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आयोजीत केलेल्या 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वात कमी अर्थात 3 वैयक्तिक शतकी खेळी झाल्या होत्या. तेव्हा भारतीय संघ विजेता ठरला होता.
यावर्षीच्या स्पर्धेत आतापर्यंत 8 सामने झाले असून 7 सामने बाकी आहेत. त्यामुळे आणखी वैयक्तिक शतकी खेळी होऊ शकतात. भारतीय संघाचा साखळी फेरीतील पुढचा सामना 2 मार्च रोजी दुबईत न्यूझीलंडविरुद्ध होत आहे. भारत व न्यूझीलंड संघ आतापर्यंत साखळी फेरीत पराभूत झालेले नाहीत. अश्या परिस्थितीत हा सामना रोमांचक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (India vs New Zeland Match)
हेही वाचा-
AFG vs ENG; अफगाणिस्तानचा विजय ऐतिहासिक! सचिन म्हणतो, हा अपसेट नाही….
शुबमन गिल संघाबाहेर? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताची चिंता वाढली
अफगाणिस्तान-इंग्लंडचा रोमांचक सामना: 642 धावा आणि विक्रमांचा पाऊस!
Comments are closed.