भाड्याच्या घरात एकाच कुटुंबातील 5 जणांनी विष पिऊन संपवलं जीवन; घटनेनं परिसरात एकच खळबळ

गुजरात: गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज (रविवारी, ता-20) एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी, त्यांच्या दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतले असून ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. सामूहिक आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

भाड्याच्या घरात एकाच कुटुंबातील पाच जणांनी जीवन संपवलं

अहमदाबाद ग्रामीण एसपींनी या घटनेबाबाच माहिती देताना सांगितले की, बावळा येथील भाड्याच्या घरात एकाच कुटुंबातील पाच जणांनी विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. हे सर्वजण मूळचे ढोलका येथील रहिवासी होते. मृतांमध्ये विपुल कांजी वाघेला (34), त्यांची पत्नी सोनल (26), त्यांच्या दोन मुली ( एक 11 वर्षांची आणि दुसरी 05 वर्षांची) आणि एक मुलगा (08 वर्षांचा) यांचा समावेश आहे.

पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घराची झाडाझडती घेत आहेत आणि या घटनेबाबतचे पुरावे गोळा करत आहेत. यासोबतच ते जवळपास राहणाऱ्या लोकांचीही चौकशी करत आहेत. हे कुटुंब मूळ कुठून राहत होते हे देखील शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

अशा घटना यापूर्वीही कधी घडल्यात

8 जून 2025: यापूर्वी, गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात, आर्थिक संकटामुळे, एका जोडप्याने त्यांच्या 9 वर्षांच्या मुलासह काडी शहराजवळील नर्मदा कालव्यात उडी मारून आत्महत्या केली. मृतांमध्ये 38 वर्षीय धर्मेश पांचाळ, त्यांची 36 वर्षीय पत्नी उर्मिला आणि 9 वर्षीय मुलगा प्रकाश यांचा समावेश आहे. धर्मेशच्या गाडीतून पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक संकटामुळे कुटुंब तणावाखाली होते. त्यामुळे त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलले आहे.

13 एप्रिल 2025: गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील वडाली शहरात एका शेतकऱ्याने रात्री पत्नी आणि तीन मुलांसह विष प्राशन केले. उपचारादरम्यान पती-पत्नीचा मृत्यू झाला. वडाली पोलिस ठाण्याने सांगितले होते की, शनिवारी सकाळी या जोडप्याला, त्यांच्या दोन मुलांना आणि एका मुलीला उलट्या होऊ लागल्या, त्यानंतर शेजाऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावली आणि कुटुंबातील पाचही सदस्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथून त्यांना हिम्मतनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले, जिथे सायंकाळी शेतकरी आणि रविवारी सकाळी त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. मृतांची ओळख पटली ती विनू सागर (42) आणि त्याची पत्नी कोकिलाबेन (40) अशी आहे.

आणखी वाचा

Comments are closed.