ग्रामपंचायतीच्या शिपाईला लाकडी दांडे, रॉडने मारहाण; एक पाय फ्रॅक्चर…, बीडमधील धक्कादायक घटना
बीड क्राईम न्यूज बीड: बीडच्या गेवराई तालुक्यातील नांदलगाव येथील ग्रामपंचायतीचे शिपाई जालिंदर सुरवसे यांना गावातील आठ ते दहा जणांनी लाकडी दांडे आणि रॉडने जबर मारहाण (Beed Crime) केली. या मारहाणीत जालिंदर सुरवसे गंभीर जखमी असून त्यांच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महिलेचा विनयभंग केल्याच्या संशयावरून ही मारहाण झाल्याचे समोर आले. जालिंदर सुरवसे यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. दरम्यान मारहाण करणाऱ्या व्यक्तींपासून आपल्याला धोका असल्याचे सुरवसे आणि त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. (Beed Crime News)
नेमकं काय घडलं? (Beed Crime News)
बीडच्या गेवराई तालुक्यातील नांदगाव येथे ग्राम रोजगार सेवकास काही गावगुंडांकडून जबर मारहाणीची घटना समोर आलीय. जालिंदर सुरवसे असे ग्राम रोजगार सेवकाचे नाव असून त्यांना गावातील काही गावगुंडांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी सध्या तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्राम रोजगार सेवकास नेमकी ही मारहाण का झाली? याच कारण अद्याप समजू शकलेले नाही. जालिंदर सुरवसे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून सुरवसे यांची आई आणि बहीण यांच्या माध्यमातून तक्रार दिली जात आहे. लाथा बुक्यांसह लोखंडी रॉड आणि काठ्यांनी सुरवसे यांना ही मारहाण झाली आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
ही बातमीही वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.