प्रेयसीने घरी बोलावले, अचानक तिचे नातेवाईक आले; तरुणाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान शिवमचा मृत्य

बीड क्राइम न्यूज बीड: प्रेम संबंधातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बीडमधील गेवराई तालुक्यातील गंगावाडी (Beed Crime News) येथे घडली आहे. तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पाच जणांवर तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आता यात खूनाचे कलम वाढविले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शिवम काशिनाथ चिकणे असे 21 वर्षीय तरुणाचे नाव असून तो अभियंत्रिकीचे शिक्षण घेत होता. शिवमचे गावामधीलचं एका मुली सोबत प्रेमसंबंध होते. प्रेयसीने घरी बोलावले असताना त्यावेळी अचानक नातेवाईक तेथे आले आणि त्यांच्यात वाद झाला.

मुलीच्या वडिलांना अटक, इतर आरोपींचा शोध-

दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी शिवमला रस्त्यात गाठून लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर शिवमला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावातही धक्कादायक प्रकार-

अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावात किरकोळ कारणावरून एका तरुणाला दोन दिवस डांबून ठेवत बांबूच्या काठ्यांनी, लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत त्याला मार लागून पोटात गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याच्यावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय. अविनाश सगट असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तरुणाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करत आहेत.

आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्यांकडूनच बीड पोलीस वसूल करणार बंदोबस्ताचा खर्च-

विविध मागण्या मान्य करण्यासाठी आत्मदहन किंवा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न काही जणांकडून केला जातो. मात्र आता बंदोबस्तासाठी नेमलेल्या मनुष्यबळाचा खर्च वसूल करण्याची भूमिका बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी घेतलीय. गुरुवारी आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या एकाला साडेतीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मागण्यांसाठी आंदोलक टोकाचे पाऊल उचलून आत्मदहन किंवा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करतात, अशा वेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठा फौजफाटा तैनात करावा लागतो. आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तासोबतच रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांनाही तैनात करावे लागते. अशा प्रकारचे अनाठायी आंदोलन केल्याने शासनाच्या मनुष्यबळ आणि यंत्रणेचा गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे बीडच्या पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

संबंधित बातमी:

शासकीय नोकरीसाठी बापानं पोटच्या तिसऱ्या मुलीला विकलं, पत्नीला हाकलून दिलं, आठ वर्षांनतर शेवटी… नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार

आणखी वाचा

Comments are closed.