बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; पोलिसात गुन्हा दाखल
बीड: जिल्ह्यातील (Beed) एका राजकीय पुढाऱ्याच्या मुलाने विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली असून पोलिसांनी (Police) गुन्हा नोंदवला आहे. बीड शहरातील चऱ्हाटा रोड भागात राहणाऱ्या आणि हल्ली शहादा जिल्हा नंदुरबार येथे वास्तव्यास असलेल्या महिलेवर अमर बांगरने वारंवार बळजबरी केली. तसेच, तक्रार देण्याचा प्रयत्न केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याचं फिर्यादीने म्हटलं आहे. या घटनेनं जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आरोपी अमर बांगर हा पीडित महिलेला सातत्याने ब्लॅकमेल करत होता. एवढेच नव्हे तर, त्याने महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केले. आरोपीचे कृत्य एवढ्यावरच थांबले नाही, त्याने पीडित महिलेला धमकावून तिच्याकडून आणि तिच्या कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणावर पैशांची देखील मागणी केली. कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून पीडितेच्या कुटुंबाने आरोपीला मोठ्या प्रमाणात पैसा दिला, मात्र त्यांचा छळ थांबला नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर पोलिसांत न्याय मागितला आहे. आरोपी अमर बांगर हा बीड जिल्ह्यातील मोठ्या राजकीय पुढाऱ्यांच्या जवळचा आणि पंचायत समितीच्या माजी सभापतींचा मुलगा असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार, खंडणी आणि गुंगीचे औषध देऊन शोषण करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. मात्र, आरोपीच्या वडिलांची राजकीय पार्श्वभूमी पाहता पोलीस किती तत्परतेने कारवाई करतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्याच्या राजकारणात आणि गुन्हेगारीत गेल्या काही महिन्यात बीड जिल्हा केंद्रस्थानी राहिला आहे. त्यामध्ये, राजकीय नेत्यांच्या वरदहस्तानेची बीडमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचे अनेक प्रकरणांवरुन दिसून आले आहे. त्यातच, आता एका राजकीय नेत्याच्या मुलाचा हा प्रताप समोर आल्याने बीडमध्ये खळबळ उडाली असून पीडितेला न्याय मिळेला का, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
बजरंग सोनवणे शेतकऱ्यांच्या बांधावर
बीडमध्ये काल रात्री झालेल्या अवकाळी, वादळी पावसाच्या तडाख्यानंतर आज खासदार बजरंग सोनवणे यांनी बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानीच्या महसूल विभाग,कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि महावितरण यांच्या संयुक्त पथकांमार्फत तात्काळ सर्व नुकसानग्रस्त भागाचे संयुक्त सर्वेक्षण करून अचूक पंचनामे करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केलीय. बीड जिल्ह्यात 15 मे पासून झालेल्या मुसळधार अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले.त्यानंतर या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेती पिके आणि शेतातील साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक आर्थिक संकटात सापडली आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.