अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराच्या घरात चोरी, मोलकरणीनेच केली हातसफाई, आमदार पावसाळी अध

नाशिक गुन्हा: नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता तर चक्क आमदारांच्याच घरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीच्या (NCP) आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांच्या नाशिकमधील जेलरोड येथील निवासस्थानी चोरी झाली आहे. या प्रकरणी त्यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीविरुद्ध घरफोडी व चोरीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोलकरीण संगीता श्याम केदारे (रा. जेल रोड) हिने कपाटातून एक लाख रुपयांची रोकड चोरल्याचा आरोप असून, पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी डॉ. प्रवीण रामदास वाघ यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी (दि. 6 जुलै) दुपारी संगीता केदारे हिने कपाटातून एक लाख रुपये चोरून नेले. या काळात आमदार सरोज अहिरे या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत होत्या. या काळातच मोलकरणीने पैशांवर डल्ला मारलाय.

मोलकरणीला पोलिसांकडून अटक

यासोबतच ऑक्टोबर 2024 ते 15 जुलै 2025 या कालावधीत घरातून वेळोवेळी रोख रक्कम चोरून नेल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रवीण वाघ यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलिसांनी संगीता केदारे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मोलकरणीला ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मंगलमूर्तीनगरातून 22 तोळे सोने, दीड किलो चांदी लंपास

दरम्यान, मोठ्या भावाकडे सहकुटुंब जेवणासाठी गेलेल्या लहान भावाच्या घरी गुरुवारी रात्री धाडसी घरफोडी झाली असून, सुमारे 22 तोळे सोन्याचे, दीड किलो चांदीचे व रोख रक्कम दहा हजार रुपये असा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. लहान भावाची पत्नी वैशाली किशोर मैद (45, रा. गौरी मंगल सोसायटीजवळ, मंगलमूर्तीनगर, कॅनॉल रोड, जेलरोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या नातेवाइकांकडे जेवणासाठी गेले होते. जेवण करून रात्री सव्वाअकराच्या दरम्यान घरी परतले तेव्हा घराचा कडी कोयंडा तोडलेला आढळून आला तसेच घरातील कपाटातील वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या दिसून आल्या व कपाटातील मुख्य लॉकरमधून सुमारे साडेएकवीस तोळे सोन्याचे दागिने व दीड किलो चांदीचे दागिने, त्यात गणपती उत्सवाकरिता केलेली आभूषणे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस तपास करीत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Nashik Crime News: कौटुंबिक वाद की प्रेम संबंध? 16 वर्षीय विद्यार्थिनीने होस्टेलमध्ये संपवलं जीवन, दोन महिन्यांपूर्वी आलेली राहायला अन्…

आणखी वाचा

Comments are closed.