स्वारगेट बस डेपोत अत्याचार झालेल्या तरुणीच्या मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड

पुणे: पुण्यातील स्वारगेट डेपोतील 26 वर्षांच्या एका तरुणीवर सराईत गुन्हेगाराने बलात्कार (Pune Rape case) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता हा प्रकार घडला. या तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे पुण्यासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. दत्तात्रय गाडे (वय 36) या गुन्हेगाराने स्वारगेट एसटी आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये (Shivshahi Bus) तरुणीवर अत्याचार केले होते. ही तरुणी पुण्यात परिचारिका म्हणून काम करत होती. ती फलटणला आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याने तिला हेरुन तिच्यावर अतिप्रसंग केला. या पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये दत्तात्रय गाडे याने पीडित तरुणीवर एकदा नव्हे तर दोनवेळा बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पीडित तरुणीने मंगळवारी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तपासाला सुरुवात झाली. पोलिसांची आठ पथके दत्तात्रय गाडे याचा शोध घेत आहेत. यादरम्यान पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी संध्याकाळी ससून रुग्णालयाने हा वैद्यकीय अहवाल पोलिसांना दिला आहे. यामध्ये आरोपीने पिडीतेवर एकदा नाही तर दोनवेळा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती देण्यात आली आहे. स्वारगेट पोलीस स्थानकापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या एसटी डेपोत मुलीवर दोनवेळा बलात्कार होतो आणि कोणाला पत्ताही लागत नाही, याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर स्वारगेट एसटी आगारात असलेली सुरक्षा यंत्रणा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे स्वारगेटमधील 23 सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्य सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्यात सातत्याने खून, मारामाऱ्या, कोयता गँगची दहशत आणि आता बलात्कार अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे पुण्यातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणात पोलीस आणि सरकार काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://www.youtube.com/watch?v=qxcx6ytmgi4

आणखी वाचा

नराधमाने शरीराचे लचके तोडल्यानंतर तरुणी स्वारगेट डेपोतून बाहेर आली, मित्राला फोन लावला अन्….

अधिक पाहा..

Comments are closed.