तरुणीवर अत्याचार केल्यानंतर नराधम दत्तात्रय गाडे कीर्तनाला गेला, टीव्हीवर फोटो झळकताच पळ काढला
दत्ताट्रे गॅड: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात (Swargate Bus Depot) एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान, तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे यांच्याबाबत मोठे खुलासे होत आहेत. दत्ता गाडे (Dattatray Gade) हा सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी त्याने चोरीचे अनेक गुन्हे देखील केले आहेत. दरम्यान, अत्याचार केल्यानंतर दत्ता गाडे याने कसा पळ काढला याची माहिती समोर येऊ लागली आहे.
दत्ता गाडे गावच्या किर्तन कार्यक्रमात सहभागी
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा मंगळवारी (दि.27) पहाटे बलात्कार करुन शिरुर तालुक्यातील गुनाट या त्याच्या गावी गेला. गावातील किर्तनाच्या कार्यक्रमात देखील तो सहभागी झाला. त्यानंतर बुधवारी सकाळपर्यंत तो गावातच होता. मात्र दुपारी माध्यमांमधून त्याचे फोटो आणि नावासह बातम्या सुरु झाल्या तेव्हा तो गायब झालाय. शिरुर तालुक्यातील गुनाट या त्याच्या गावी पोलीस उसाच्या शेतात ड्रोनच्या सहाय्याने त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांसोबतच श्वान पथक देखील आरोपीच्या शोधासाठी तैनात
दरम्यान, फरार आरोपी दत्ता गाडे याचा शिरूरच्या साळुंखे फार्म हाऊस परिसरात पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आलाय. पोलिसांसोबतच श्वान पथक देखील आरोपीच्या शोधासाठी तैनात करण्यात आलंय. 48 तासांपासून पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपी गाडे थेट जन्मगाव असलेल्या गुणाट गाव परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
इतकच नाही तर आरोपी याच परिसरातील शेतात लपवून बसला असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी श्वान पथक बोलावले असून त्या मार्फत आरोपीचा शोध घेतला जात आहे..पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची आठ ते दहा पथके आरोपीच्या मागावर आहेत. आरोपी दत्तात्रय गाडीच्या गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुणाट गाव
याच गावात आरोपी दत्ता गाडे यांचं घर आहे
स्वारगेट मध्ये अत्याचार केल्यानंतर गाडे याने थेट शिरूर गाठले होते
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून याठिकाणी देखील तपास सुरू आहे
https://www.youtube.com/watch?v=mgwoycyjypc
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.