मुंबई-पुण्यात घर विक्री मंदावली… हजारो घरे धूळ खात पडून, 2025 मध्ये रिअल इस्टेट मार्केट थंड

एकीकडे घराच्या किमती वेगाने वाढताहेत, तर दुसरीकडे घर खरेदीदारांची संख्या कमी होतेय. 2025 या चालू वर्षात घर विक्रीत मोठी घट दिसून येत आहे. एप्रिल-जून 2025 च्या तिमाहीत रिझर्व्ह बँकेने गृहकर्जाच्या व्याजदरात 100 बेसिस पॉइंटची कपात केली. मात्र त्याचा प्रभाव घर विक्रीवर पडला नाही.

एनारॉक प्रॉपटी कन्स्लटंटच्या दुसऱ्या तिमाहीतील रिपोर्टनुसार, देशातील सात प्रमुख शहरांतील घर विक्रीत 20 टक्के घट झाली आहे. म्हणजे 96300 युनिटची विक्री घटली आहे. त्याच वेळी घरांची सरासरी किंमत 11 टक्क्यांनी वाढलेली दिसत आहे. मुंबई व पुणे अशा शहरांतील घर विक्री 25-27 टक्क्यांनी घसरली. हैदराबाद आणि एनसीआरमध्ये अनुक्रमे 27 टक्के व 14 टक्के घट झालीय. चेन्नईत मात्र आश्चर्यकारक बदल दिसून येत आहे. चेन्नईत घर विक्रीत वार्षिक 13 टक्के वाढ दिसत आहे. घरांची विक्री कमी होत असली तरी घरांच्या किमती काही कमी होताना दिसत नाहीत. हैदराबाद, पुणे, चेन्नईमध्ये घरांच्या किमती 611 टक्के वाढल्या आहेत.

Comments are closed.