कालपर्यंत हसत बोलत होता; आज त्याचं शव ओळखायला सांगतायत, दिल्लीच्या स्फोटानंतर रुग्णालयाबाहेर ना
दिल्ली: लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या कार स्फोटाचा (Delhi Red Fort Blast) तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. या स्फोटात आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत, स्फोटक भरलेली कार चालवणारा व्यक्ती (Delhi Red Fort Blast) कश्मीरच्या पुलवामातील डॉक्टर उमर नबी असल्याची शंका आहे. कारमध्ये स्फोट करण्यासाठी यामध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर केल्याचा संशय आहे. जम्मू-कश्मीर पोलिसांनी स्फोटस्थळी सापडलेल्या अवशेषांशी तपासणी करण्यासाठी उमरच्या आईचा डीएनए नमुना घेतला आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये स्फोटाला ‘बॉम्ब ब्लास्ट’ म्हटले गेले आहे व यूएपीए आणि एक्स्प्लोसिव्ह अॅक्टअंतर्गत दहशतवादी कटाचे कलम लावण्यात आले आहेत.(Delhi Red Fort Blast)
Delhi Red Fort Blast: आय२० कारमध्येच स्फोटक भरून दिल्लीमध्ये प्रवेश केल्याचे तपासात आढळले
हा स्फोट घडायच्या काही तास आधीच पोलिसांनी ८ जणांना अटक केली होती, त्यात ३ डॉक्टरांचा समावेश आहे आणि अमोनियम नायट्रेट, डिटोनेटर आणि रसायने यासह २,९०० किलो स्फोटक साहित्य जप्त केले होते. फरीदाबादमधील युनिव्हर्सिटी येथे कार्यरत असलेल्या डॉ. मुज्जम्मिल गनई आणि डॉ. शहीन सईद यांना अटक केली आहे. शहीन ही जेश-ए-मोहम्मदची महिला भरती प्रमुख असल्याचा आरोप आहे. अल फला, उमर नबी, हा देखील त्याच नेटवर्कशी जोडलेला होता. त्याने आय२० कारमध्येच स्फोटक भरून दिल्लीमध्ये प्रवेश केल्याचे तपासात आढळले आहे.
Delhi Red Fort Blast: अश्रूनी भरलेले डोळे अन् मनात आशा ठेवून कुटुंबीय आपल्या व्यक्तींच्या प्रतीक्षेत
तर दुसरीकडे या घटनेत मृत आणि जखमी झालेल्यांच्या नातेवाईकांनी, प्रियजनांनी आपली आपबिती सांगितली आहे. भीषण स्फोटानंतर एलएनजेपी रुग्णालयाबाहेर मंगळवारी पहाटेपासूनच अश्रूनी भरलेले डोळे अन् मनात आशा ठेवून कुटुंबीय आपल्या त्या व्यक्तींच्या प्रतीक्षेत दिसत होते. रुग्णालयाच्या गेटवर सुरक्षा कडक करण्यात आली होती, पण त्याच्या बाहेर उभ्या असलेल्या शेकडो कुटुंबीयांची अवस्था पाहून कोणाचंही मन भरून येईल आणि डोळे पाणावतील अशी स्थिती निर्माण झाली होती.
काहींच्या हातामध्ये फोटो धरले होते, काही फोनकडे पाहत होते. प्रश्न एकच होता…” आमचा माणूस कुठे आहे? तो कसा आहे? तो ठिक आहे का?” स्फोटातील मृतदेहांचे तुकडे, तुटलेले अवयव, आतडे बाहेर आलेली शरीरे पाहून शवागृहातील कर्मचारीही भावून झाल्याचे दिसून आले.
Delhi Red Fort Blast: कालच चहा पीत होतो आणि आज त्याचं शव…
या स्फोटामध्ये नौमान नावाचा तरुण यात ठार झाला. त्याचे कुटुंब सकाळी शव ओळखल्यानंतर शांतपणे अँम्ब्युलन्सच्या मागे जात होते. नौमानचा मित्र सोनू शवागृहाच्या बाहेर बसलेला होता. त्याला आत जाण्याची हिंमतच होतच नव्हती. “कालच आम्ही चहा पीत होतो, आज मला त्याला तुकड्यांमध्ये पाहायला सांगताहेत…” एवढंच तो म्हणू शकला.
Delhi Red Fort Blast: ‘जिवंत आहे की नाही?’
तर रूग्णालय परिसरामध्ये एका महिलेनं रडत रडत सांगितले की, “आम्ही रात्रीपासून इथे आहोत. एक शब्द तरी सांगा, आमचा माणूस जिवंत आहे की नाही…” आत रुग्णालयात डॉक्टर जखमींची काळजी घेत होते, तर बाहेर वाट बघणं, आशा, व्याकूळता आणि मोठ्या दु:खात सापडलेली कुटुंबे होती. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.