Video – आकाशात थरार; उड्डाणानंतर विमानचं इंजिन पेटलं, ‘डेल्टा बोईंग 767’चे लॉस एंजेलिसमध्ये इमर्जन्सी लँडिंग

अहमदाबाद येथील विमान अपघाताच्या आठवणी अद्यापही ताज्या आहेत. 12 जूनला लंडनला निघालेले एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतर काही क्षणात कोसळले होते. या दुर्घटनेत विमानातील 52 ब्रिटीश नागरिकांसह 241 प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते, तर एक जण सुदैवाने वाचला होता. तर विमानाबाहेरील 18 ते 19 जणांचाही यात मृत्यू झाला होता. याच दरम्यान अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात येणाऱ्या लॉस एंजेलिस येथे अहमदाबाद-लंडन विमान अपघाताची पुनरावृत्ती टळली आहे. येथे डेल्टा एअरलाईन्सच्या अटलांटा येथे जाणाऱ्या विमानाला उड्डाणानंतर आग लागली होती. त्यामुळे लॉस एंजेलिसमध्ये या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
❗ बोइंग 787 ला एलए मध्ये आपत्कालीन लँडिंग करते – इंजिन ऑन फायर 🔥
शुक्रवारी अटलांटासाठी डेल्टा एअरलाइन्सचे उड्डाण दर्शविल्याचा व्हिडिओ दावा करतो. टेक-ऑफ नंतर इंजिनला लवकरच आग लागली.
📹 @Lalightslive https://t.co/t1hbvldi0p pic.twitter.com/vyngkpzjcq
– rt_india (@rt_india_news) 19 जुलै, 2025
Comments are closed.