स्ट्राँग रुममध्ये EVM चा संशयास्पद आवाज, दोन्ही शिवसेनेचा आक्षेप, गोंधळानंतर आजपासून खडा पहारा
धाराशिव : स्ट्रॉंग रुममध्येच ईव्हीएमची पडताळणी केल्याने धाराशिवमध्ये गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या रुममधून मशीनचा संशयास्पद आवाज आल्याने गोंधळ उडाला होता. याबाबत दोन्ही शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. आज पासून खडा पहारा देण्याचा इशारा दोन्ही शिवसेनेने दिला आहे.न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेल्या धाराशिव शहरातील तीन प्रभागातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून मशीनची पडताळणी केली जात होती.
उमेदवार किंवा पक्षाला कुठलीही सूचना न देता मशीनची पडताळणी केल्याचा आरोप
उमेदवार किंवा पक्षाला कुठलीही सूचना न देता मशीनची पडताळणी केल्याचा दोन्ही शिवसेनेने आरोप केला आहे. दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रशासनाला जाब विचारला आहे. स्ट्रॉंग रुममध्ये मशीन ठेवल्यापासून आतापर्यंत सीसीटीव्ही फुटेज द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
21 डिसेंबरला एकत्रितपणे सर्व निवडणुकींचे निकाल जाहीर होणार
राज्यातील नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीचे मतदान 2 डिसेंबरला पार पडले आहे. काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्यासाठी 20 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 21 डिसेंबरला एकत्रितपणे सर्व निवडणुकींचे निकाल जाहीर होणार आहेत. 2 डिसेंबरला झालेल्या मतदानाच्या मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. अशातच आता उमेदवारांकडून EVM मशीनमध्ये फेरफार होऊ नये साठी काळजी घेतली जात आहे. जळगावधाराशिव, धुळे आणि सोलापूरमधील उमेदवार स्ट्राँग रूमच्या बाहेर पहारा देत असल्याचे समोर आले आहे. धाराशिव मधील परंडा नगरपालिकेलाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडले आहे. परांड्यातील स्ट्राँग रूमभोवती पोलीसांसह राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि उमेदवार पहारा देताना दिसत आहेत. परंडा येथे शिवसेनेकडून खडा पहारा दिला जात आहे. परंडा नगरपालिकेत आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांचे गट आमने-सामने आहेत. या ठिकाणी तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांकडून पहारा दिला जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. काही ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर काही ठिकणी गोंधळ झाळ्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. आणखी काही नगरपंचायत आणि नगरपरिषदांसाठी 20 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 21 डिसेंबरला निकाल लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
सांगलीत राडा; स्ट्र्राँग रुमबाहेर मोठ्या संख्येनं जमले लोकं; नगरपालिकेसाठी झालेल्या मतदानात 2900 मतांचा फरक
आणखी वाचा
Comments are closed.