देवडी माताचा आशीर्वाद घेण्यासाठी एम एस धोनी कुटुंबासह मंदिरात, फोटो व्हायरल!

एम. एस. धोनी (MS Dhoni) हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. सध्या तो केवळ आयपीएलमध्ये खेळत आहे आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनेक वर्षांपूर्वीच निवृत्ती घेतली आहे. नुकताच धोनी रांची येथील प्रसिद्ध देवडी मातेच्या दर्शनासाठी कुटुंबासोबत मंदिरात गेला होता. या भेटीचे काही खास फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

एम. एस. धोनी सोशल मीडियापासून नेहमीच दूर असतो. त्यामुळे आयपीएल व्यतिरिक्त त्याला इतर ठिकाणी पाहणं फारसं शक्य होत नाही. तरी अधूनमधून त्याचे काही खास फोटो समोर येत असतात. यावेळी धोनी रांची येथील देवडी मातेच्या मंदिरात पत्नी साक्षी धोनी आणि मुलगी जिवासोबत दर्शनासाठी गेला होता. त्यांच्या या भेटीचे काही सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपले गेले असून, ते सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.

आयपीएल (IPL 2025) हंगाम एम. एस. धोनीसाठी ठीकठाक ठरला. त्याने चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) 14 सामने खेळले आणि एकूण 196 धावा केल्या. धोनी सहसा खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत असल्यामुळे त्याच्याकडे फारशा चेंडूंचा सामना करण्याची संधी नव्हती. त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा ठेवणाऱ्या चाहत्यांना फारसं समाधान मिळालं नाही. यंदाच्या हंगामात त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 30 धावांची होती. त्याने 12 चौकार आणि 12 षटकार मारले. मात्र, CSK संघाने या हंगामात निराशाजनक कामगिरी केली आणि गुणतालिकेत दहाव्या स्थानावर हंगाम संपवला.

प्रत्येक वर्षी असं वाटतं की, हा धोनीचा शेवटचा IPL हंगाम असेल. मात्र, गेल्या काही वर्षांपासून धोनी आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का देत आहेत. त्याने IPL 2026 मध्ये खेळणार की नाही यावर अद्याप कोणतंही वक्तव्य केलं नाही. धोनी याआधीही सांगत आला आहे की, तो फार पुढचा विचार करत नाही. त्यामुळे 44 वर्षांच्या धोनीने IPL 2026 बाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नसावा. सध्या CSK संघातील नवख्या खेळाडूंना त्याच्या अनुभवाची गरज आहे. त्यामुळे तो पुढच्या हंगामातही खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

Comments are closed.