एकतर्फी निकाल लागेल वाटलं नव्हतं, बिहार निवडणूक निकालांवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

सशक्त लोकशाहीमध्ये हार आणि जीत होत असते मी नितेश कुमार यांना मिळालेल्या बहुमत बद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करते. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या आहेत की, एकतर्फी निकाल लागेल वाटलं नव्हतं.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “यावेळी आमच्यापेक्षा त्यांचा गटबंधनचा परफॉर्मन्स अर्थातच आमच्यापेक्षा चांगला होता. बिहारच्या जनतेने नितेश कुमार यांच्यावर पुन्हा विश्वास दर्शवला आहे. हे सध्यातरी आकडेवारीवरून दिसून येत आहे. नितीश कुमार हे संपूर्ण निवडणूक कॅम्पेन लीड करत होते. त्यामुळे हे यश नितेश कुमार यांचा आहे. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते.”
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “बिहार निवडणूक कव्हर करण्यासाठी गेलेले पत्रकार असो किंवा प्रचारासाठी गेलेल्या अनेक लोकांनी मला सांगितले के नितीश कुमार यांच्या बद्दल बिहारच्या जनतेमध्ये खूप आदर आणि प्रेम आहे. नितेश कुमार यांनी शेवटच्या तीन महिन्यांमध्ये ज्या योजना राबवल्या आहेत. त्याचा इम्पॅक्ट निवडणुकीमध्ये असू शकतो.”
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “बिहार निवडणुकीचे इलेक्शन टॉफ होणार असे अनेक सर्वे दाखवत होते. कव्हर करणारे अनेक लोकांनी विश्वास दर्शवला होता की हे इलेक्शन एकतर्फ राहणार नाही. मी काल दिल्लीला होते त्यावेळी देखील अशी चर्चा होती की बिहार इलेक्शन टॉफ असणार आहे. एवढं मोठं एकतर्फे बहुमत मिळणार हे कुणालाही वाटलं नव्हतं जे जिंकले आहेत त्यांना देखील वाटत नव्हतं की एवढा मोठा एकतर्फी बहुमत मिळेल. यावेळी हे मान्य करावे लागेल की हा विजय नितेश कुमार यांचा आहे.”
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “ईव्हीएम आणि मतदार यादी संदर्भात मी अनेकदा सांगितले आहे, माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात देखील कितीतरी केसेस आहे हे मी वारंवार सांगितले आहे विशेष म्हणजे आम्ही हे सर्व सांगितल्यानंतर मीडियाने वास्तव्य परिस्थिती देखील जनतेच्या समोर मांडली आहे. भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या मित्रपक्षाने देखील मत चोरी संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.”

Comments are closed.