“पाकिस्तानच्या क्रिकेट अपयशावर संसदेत खडाजंगी, पंतप्रधान बोलणार थेट!”

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तान संघाचं प्रदर्शन खूप लाजिरवाणं होतं. मोहम्मद रिजवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ स्पर्धेतील एकही सामना न जिंकता स्पर्धेबाहेर पडला. आता हा मुद्दा पाकिस्तानच्या संसदेमध्ये मांडला जाणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ पाकिस्तानच्या पराभवानंतर या मुद्द्यावर संसदेत त्यांचा मत व्यक्त करतील.

पाकिस्तान पहिला संघ ठरला जो की यजमान असून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील एकही सामना जिंकला नाही. याआधी 2000 साल मध्ये केनिया यजमान असून स्पर्धेचा एकही सामना जिंकले नव्हते त्यावेळी फॉरमॅट वेगळा होता.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे राजनैतिक सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी एका चॅनेलवर याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की पंतप्रधान पाकिस्तानच्या पराभवाचा मुद्दा संसदेत मांडणार आहेत.

राणा यांनी सांगितले की,‌ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तान संघ सुरुवातीलाच बाहेर पडला. संघाची खेळातील कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. याबाबत सरकार काय तो निर्णय घेईल. पंतप्रधान शहबाज शरीफ याबाबत योग्य निर्णय घेतील. तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ही एक स्वतंत्र संस्था आहे. पण ते पाकिस्तान क्रिकेट बोर्ड संबंधित या मुद्द्यांवर कॅबिनेट आणि संसदेत बातचीत करणार आहेत.

ते म्हणाले नक्कीच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्यांचे निर्णय स्वतःच घेतो. पण त्यांनी सांगितले, पंतप्रधान म्हणाले की संघाच्या अशा पराभवानंतर हा मुद्दा संसदेत मांडला पाहिजे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन यांच्या नियुक्तीचाही मुद्दा संसदेत मांडला जाईल.

19 फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात झाली होती. यानंतर 5 दिवसात यजमान पाकिस्तान स्पर्धेमधून अधिकृतरित्या बाहेर पडला. पहिला सामना पाकिस्तान संघ न्यूझीलंडविरुद्ध 60 धावांनी हरला. त्यानंतर भारतीय संघाने 23 फेब्रुवारी रोजी 6 विकेट्स पाकिस्तानला पराभूत केले. पॉईंट्स टेबल मध्ये सुद्धा पाकिस्तान संघ सगळ्यात खालच्या स्थानी होता आणि एकही सामना न जिंकता पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

हेही वाचा

“हिटमॅन रोहितबद्दल शिखर धवनने सांगितली अनोखी गोष्ट, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!”

चॅम्पियन्स ट्रॉफीमधून पाकिस्तानची गच्छंती, लज्जास्पद विक्रमाची नोंद!

“विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर पाठवलेल्या मेसेजबाबत धोनीने केला मोठा खुलासा!”

Comments are closed.