डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक, शरद पवार यांच्याकडून रुग्णालयात जाऊन विचारपूस

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी रुग्णालयात जाऊन डॉ. आढाव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

हृदयाशी संबंधित त्रास वाढल्याने डॉ. आढाव यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयरोगतज्ञ डॉ. अभिजित वैद्य आणि त्यांच्या टीमकडून उपचार सुरू आहेत. प्रकृती गंभीर असली तरी सध्या ती स्थिर आहे. अफवा पसरवू नयेत किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

Comments are closed.