ED Raid on Rajiv Arora's Property आपचे नेते संजीव अरोडा यांच्या मालमत्तांवर ED चा छापा, दिल्ली आणि उत्तरप्रदेश या ठिकाणी कारवाई
अंमलबारी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते संजीव अरोरा यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी सकाळी, ईडीने दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाबसह अरोरा यांच्या सहा ठिकाणी छापे टाकले. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) सुरू असलेल्या तपासाच्या संदर्भात ही कारवाई केली जात आहे.
अंमलबारी संचालनालयाच्या पथकाने मंगळवारी सकाळी पंजाबमधील लुधियाना आणि जालंधर, उत्तर प्रदेशातील बरेली, दिल्ली-नोइला येथील एकूण सहा ठिकाणी छापे टाकून शोधमोहीम सुरू केली. तपास यंत्रणा ज्या परिसरांची झडती घेत आहे, त्यामध्ये या प्रकरणाशी संबंधित व्यक्ती आणि संघटनांची निवासस्थाने आणि व्यावसायिक कार्यालयांचा समावेश आहे.
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार ही कारवाई हॅम्पटन स्काय रियल्टी लिमिटेडशी संबंधित कथित आर्थिक व्यवहार आणि मनी लाँडरिंगच्या तपासाचा एक भाग आहे. ईडीची पथके नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथे कागदपत्रे आणि डिजिटल नोंदींचीही तपासणी करत आहेत. सध्या, ईडीने या छाप्यांसंदर्भात कोणतेही सविस्तर अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानांवर छापे: अरविंद केजरीवाल
ईडीच्या छाप्यांसंदर्भात, आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले आहे की, “ईडी आज पुन्हा पंजाबमधील हिंदू व्यावसायिकांवर छापे टाकत आहे. अंमलबारी संचालनालय पंजाबमधील छोट्या हिंदू व्यावसायिकांना त्रास देत आहे. मी सर्व व्यावसायिकांना आवाहन करतो – घाबरण्याची गरज नाही. संपूर्ण पंजाब आणि पंजाब सरकार तुमच्यासोबत आहे. आपण सर्व मिळून ईडीचा सामना करू.”
गेल्या महिन्यात चंदीगडमधील त्यांच्या शासकीय निवासस्थानी दिवसभर चाललेल्या छाप्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने संजीव अरोरा यांना अटक केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अरोरा हे पंजाबमध्ये ऊर्जा, उद्योग आणि वाणिज्य मंत्री होते. अरोरा यांच्या अटकेनंतर, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारने त्यांची खाती इतर मंत्र्यांना दिली.
Comments are closed.