बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार


मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असून भाजप एनडीए (भाजप) आघाडीला मोठं बहुमत मिळताना दिसून येत आहे. बिहारमधील 243 जागांपैकी 200 पेक्षा जास्त जागांवर भाजप-जेडीयू एनडीए आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर, काँग्रेस-राजद महाआघाडी केवळ 35 जागांवर आघाडी मिळत असल्याचे पाहायला मिळते. या निकालानंतर अनेकांना महाराष्ट्रातील विधानसभेच्या (Vidhansabha 2025) निकालाची आठवण झाली आहे. कारण, बिहारमध्येही मोठा विजय एनडीएचं होत असून महाराष्ट्रातील महायुतीप्रमाणेच हा निकाल लागत असल्याचे दिसते. आता, बिहार विधानसभा निकालावर नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया येत असून भाजपने आनंद व्यक्त केला आहे. तर, शिवसेना, काँग्रेस नेते आपल्या परीने विश्लेष करत आहेत. बिहार ट्रेलर आहे, खरा पिच्चर मुंबईबाई). महापालिका असल्याचं भाजप नेते अमित साटम यांनी म्हटलं आहे.

बिहार विधानसभा निकालावर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मत चोरीचा फेक नेरेटिव्ह बिहारच्या जनतेने उधळून लावला. विरोधकांनी केलेले मत चोरीचे आरोप म्हणजे जनतेचा अपमान आहे. बिहारच्या जनतेनं निकालातून उत्तर दिलय. बिहारची निवडणूक म्हणजे ट्रेलर असून खरा चित्र मुंबई महापालिका निवडणुकीत दिसेल, असा विश्वास अमित साटम यांनी व्यक्त केला. तसेच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही एनडीएला भरघोस समर्थन मिळेल, असा दावाही त्यांनी केलाय. दुसरीकडे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही बिहार निवडणुकांच्या निकालावर भाष्य केलंय. अंधारे यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि स्वायत्त संस्थांवर या विजयाचं खापर फोडलं आहे. तर, संजय राऊत यांनीही निवडणूक आयोगाचा दाखला देत या निकालाची तुलना महाराष्ट्रासोबत केलीय.

मुंबई महापालिकेतही भगवा फडकणार

''मुंबईकरही येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना कडक उत्तर देतील, मुंबईत भगवा झेंडा फडकवल्याशिवाय मुंबईकर शांत बसणार नाही”, असे म्हणत अमित साटम यांनी राहुल गांधींवर हल्ला चढवला. “राजकारणाचे खरे पप्पू तेच” आहेत. “राहुल गांधींच्या नादाला लागणारे एकामागून एक पराभूत होत आहेत, असे म्हणत तेजस्वी यादव आणि उद्धव ठाकरे यांच्यावर साटम यांनी हल्लाबोल केला. विरोधकांचा सत्याचा मोर्चा हा प्रत्यक्षात फेक नेरेटिव्हचा तमाशा असल्याचेही साटम यांनी म्हटले.

संसदीय लोकशाहीचे पतन, वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते

बिहारचा निवडणूक निकाल हे काँग्रेसच किंवा महाविकास आघाडीचे पतन नाही तर इथल्या संसदीय लोकशाहीचे पतन आहे. स्वायत्त यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या घरगडी असतील तर मालकाच्या विरोधी काम कसे होईल? असे सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. तर, बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते. एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्यांना 50 च्या आत संपवले, असे ट्विट खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

हेही वाचा

बिहारच्या निकालावर देवाभाऊची छाप, 7 जिल्ह्यातील 49 मतदारसंघातील उमेदवार आघाडीवर!

आणखी वाचा

Comments are closed.