Vijay Patkar : “मंत्र्याचा OSD कोल्हापुरात ठाण मांडून बसलाय…”; विजय पाटकरांनी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील ‘दबावशाही’ केली उघड!
Vijay Patkar : अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. अभिनेते विजय पाटकर (Vijay Patkar) विरुद्ध मेघराज भोसले अशी लढत दिसून येणार असल्याची सर्वत्र चर्चा होती. कलाकार, विचारसरणी आणि संघटनशक्तीची खरी लढाई आता या निवडणुकीत रंगणार आहे. बाबा पाटलांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत अभिनेते विजय पाटकर (Vijay Patkar) यांनी २०१४ ते २०१६ या काळात अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये त्यांना विरोधी पॅनेल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळची मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत मी उमेदवारी अर्ज भरून कोल्हापूरला पाठवला होता मात्र राजकारण करून काही लोकांनी माझा उमेदवारी अर्ज भरू दिला नाही, अशी खंत अभिनेते विजय पाटकर यांनी व्यक्त केली आहे.(Vijay Patkar)
Vijay Patkar : एका मंत्र्यांचा ओएसडी मागच्या ४ दिवसापासून कोल्हापूरात
पुढे विजय पाटकर म्हणाले की, एका मंत्र्यांचा ओएसडी मागच्या ४ दिवसापासून कोल्हापूरात आहे आणि तो लोकांवर दबाव आणत आहे. त्यांच्या वतीने हा व्यक्ती नको, तो व्यक्ती नको असं सांगितलं जात आहे. मोठा दबाव आणला जात आहे. मला कळत नाही त्या मंत्र्याला आणि ओएसडी यांची विधानभवनातील सगळी कामे संपली आहेत का? जेणेकरून ते चित्रपट महामंडळात ठाण मांडून बसले आहेत, असंही पुढे त्यांनी म्हटलं आहे.(Vijay Patkar)
Vijay Patkar : महामंडळाच अक्षरशः थडग केलं
तर माझा आक्षेप मेघराज राजेभोसले वर आहे. त्याला लाज वाटायला पाहिजे मागील १० वर्ष काय केलं. महामंडळाच अक्षरशः थडग केलं याने. ७ महिने कर्मचाऱ्यांचा पगार देखील दिला नाही. उलट मला फोन करतोय आणि म्हणतोय माझा पॅनल मधून उभे रहा. याला लाज कशी वाटत नाही. मी काय माती खाल्ली आहे का? याच्या पॅनल मधून उभा राहायला, असंही पाटणकरांनी म्हटलं आहे. मागील ४० वर्ष आम्ही इंडस्ट्रीत आहोत. आम्ही कधी राजकारण्यांकडे येतो का? त्यांनी कशाला इकडे यायला हवं? निलम शिर्के अध्यक्षा होत असतील तर होऊदे, पहिल्यांदा अध्यक्ष होईल. ती माझी मैत्रीण आहे. मी पॅनेल उभा करेल म्हणून माझा उमेदवारी अर्ज भरू दिला गेला नाही, असंही पुढे अभिनेते विजय पाटकर यांनी म्हटलं आहे.
Vijay Patkar : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक कधी?
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक सध्या राज्यभर चर्चेचा विषय आहे. ही निवडणूक कोल्हापूर विरुद्ध पुणे, मुंबई अशी होणार अल्याचं चित्र आहे. २५ मे रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार असून, त्याच दिवशी अर्जाची छाननी केली जाणार आहे. २६ ते २८ मे दरम्यान अर्ज माघारीची मुदत ठेवली आहे. त्यानंतर २९ मे रोजी अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप जाहीर केले जाईल, तर ७ जून रोजी कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथे मतदान होणार होणार आहे. ८ जूनला मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.