Fact Check : बाबर आझमचा एडिटेड व्हिडिओ चॅम्पियन्स ट्रॉफीचा असल्याचं सांगून शेअर, फॅक्ट चेकमध्ये
नवी दिल्ली : वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बाबर आझमचा व्हिडिओ व्हायरल होतो, ज्यात तो रागावलेला असल्याचं पाहायला मिळतं, ज्यात काही लोक जय श्रीराम चा नारा देत असल्याचं दिसून येतं. आता काही यूजर्सनी व्हिडिओ चॅम्पियन्स ट्रॉफीशी जोडून शेअर केला आहे.
विश्वास न्यूजच्या पडताळणीत व्हायरल दावा खोटा दिसून आला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली क्लिप एडिटेड आहे.तो व्हिडिओ 2024 चा असून पाकिस्तान सूपर लीगचा आहे. ज्यात बाबर आझमला पाहून लोक ‘जिम्बाबर’ चे नारे लावले होते. लोक एडिटेड व्हिडिओ चुकीच्य दाव्यासह शेअर करत आहेत.
काय व्हायरल होतंय?
फेसबुक वापरकर्ता ‘Prakash Maurya’ ने 24 फेब्रुवारी 2025 ला व्हिडिओ शेअर करुन म्हटलं की “बाबर भारत-पाकिस्तान च्या मॅचमध्ये आझम काय म्हणाला पाहा”
याला सत्य मानून इतर यूजर्स देखील व्हिडिओ व्हायरल करत आहेत. याच्या अर्काईव्ह पोस्ट इथ क्लिक करुन पाहू शकता.
पडताळणी
व्हायरल व्हिडिओच्या पडताळणीसाठी आम्ही कीवर्डद्वारे गुगल सर्च केलं. आम्हाला अलीकडील रिपोर्ट मिळाला नाही, ज्यामुळं व्हायरल दाव्याची पडताळणी होते. सर्चच्या दरम्यान व्हायरल व्हिडिओ क्रिकिथ नावाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर मिळाला. 24 फेब्रुवारी 2024 ला अपलोड केलेल्या व्हिडीओच्या माहितीनुसार हा व्हिडिओ पाकिस्तान सुपर लीग 2024 च्या वेळचा आहे, बाबर आझम डगआऊटमध्ेय बसला होता, तिथं काही लोकांनी बाबरला ‘जिम्बाबर’ म्हणून चिडवण्यास सुरुवात केली. व्हिडीओ त्यावेळचा आहे.
पडताळणीत आम्हाला freepressjournal.in ची या वेबसाईटची बातमी मिळाली जी 24 फेब्रुवारी 2024 ला प्रकाशित झाली. ज्यात उल्लेख होता की पीएसएल 2024 च्या दरम्यान गर्दीतील काही लोकांनी बाबर आझमला ‘जिम्बाबर’ म्हणून चिडवलं होतं. यावर बाबर संतापला होता त्यानं चाहत्यांना बाटलीनं मारण्याची धमकी दिली होती.
व्हायरल व्हिडीओशी संबंधित बातम्या तुम्ही इथं पाहू शकता.
यापूर्वी देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यावेळी विश्वास न्यूजनं पाकिस्तानचे पत्रकार आदिल अली सोबत संपर्क केला होता. त्यांनी व्हायरल दावा चुकीचा असल्याचं म्हटलं होतं. मूळ व्हिडिओ एडिट करुन व्हायरल केला जात आहे. फॅक्टचेकचा रिपोर्ट इथं वाचू शकता.
शेवटी आम्ही व्हिडीओ शेअर करणाऱ्या यजूरच्या प्रोफाईलचं स्कॅनिंग केलं, आम्हाला या यूजर्सचे 5 हजार फॉलओअर्स असल्याचं स्पष्ट झालं. यूजर उत्तर प्रदेशातील मोतीपूरचा असल्याचं सांगितलं.
निष्कर्ष: विश्वास न्यूज ने केलेल्या पडताळणीत बाबर आझमचा व्हायर व्हिडिओ एडिटेड असल्याचं स्पष्ट झालं. चॅम्पियन्स ट्रॉफीशी त्याचा संबंध नाही. हा व्हिडीओ पाकिस्तान सुपर लीगचा आहे. लोकांनी बाबरसाठी ‘जिम्बाबर’च्या घोषणा दिल्या होत्या, तो आताचा सांगून शेअर केला जातोय.
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा विश्वास न्यूजवर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं ‘Shakti Collective’ अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]
अधिक पाहा..
Comments are closed.