डोनाल्ड ट्रम्प यांना फिफाचा ‘शांतता पुरस्कार’

नोबेलचा शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतीही कसर सोडली नाही. या पुरस्कारासाठी जंग पछाडूनही त्यांना नोबेल पुरस्काराने हुलकावणी दिली असली तरी फुटबॉलची जागतिक संस्था फिफाने ट्रम्प यांना ‘शांती पुरस्कार’ देऊन गौरवले आहे. फिफाने या वर्षापासून ‘शांती पुरस्कार’ सुरू केला असून या पुरस्काराचे पहिले मानकरी ट्रम्प हे ठरले आहेत. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेटिनो हे ट्रम्प यांचे जवळचे मित्र आहेत. गाझा युद्ध बंदी केल्याप्रकरणी ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी जियानी इन्फेंटिनो यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. फिफाच्या आगामी विश्वकपसाठी आयोजित केल्या जाणाऱया एका कार्यक्रमात जियानी यांनी राष्ट्राध्यक्षाचे स्वागत करताना या पुरस्काराची घोषणा केली. हे तुमच्यासाठी एक सुंदर मेडल आहे. तुम्ही ज्या ठिकाणी हवे त्या ठिकाणी गळ्यात घालू शकता. यानंतर ट्रम्प यांनी हे पदक गळ्यात घातले. या पदकासोबत एक प्रमाणपत्रही देण्यात आले.

Comments are closed.