काठीने चोप ते लघुशंका पाजणं; पायातला बूट तोंडात धरायला लावायचा अन्…; भूत उतरवणाऱ्या भोंदूबाबा

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या शिऊर गावातून एक थरारक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. इथे एक बाबा अघोरी पद्धतीने सामान्यांच्या वर उपचार करत होता. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि एबीपी माझा त्याचा फांडाफोड केला. मुल होत नाही, लग्न होत नाही, दारू सोडत नाही, अंगात भूतबाधा झाली आहे, अशा नागरीकांना मग ती महिला असो वा पुरुष तो त्याना काठीने मारायचा. स्वतःचा बूट तोंडात धरायला लावायचा आणि मंदिराला गोल चकरा मारायला लावायचा. झाडाची पानं खायला द्यायचा. एवढेच नव्हे तर लघु शंका करून तो पिण्यासही देत असे. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

वैजापूरच्या शिऊर गावातील अंधश्रद्धेचा बाजार

एबीपी माझाने वैजापूरच्या शिऊर गावातील अंधश्रद्धेचा बाजार समोर आणल्यानंतर पोलिसांकडून स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि बाबाचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे जो बाबा दुसऱ्याचे लग्न जमवत होता, त्याच्यावरच पत्नीच्या छळाचा पूर्वी गुन्हा दाखल आहे. याबाबतची माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक विनय राठोड यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मंदिराच्या बाहेर दोन मोठ्या लाकडी काट्या

गावामध्ये बिरोबाचे मंदिर आहे. त्या ठिकाणी हा सर्व प्रकार सुरू होता. मंदिराच्या बाहेर दोन मोठ्या लाकडी काट्या दिसून आल्या, या काट्यांनी तो येणाऱ्या भक्तांना भूत लागलं असल्याचं सांगत मारहाण करायचा. ज्यांना भूतबाधा झाली आहे अशांना तो मारायचा, त्यानंतर त्याचा बूट तोंडात धरायला लावायचा. महिलांना देखील तो नको त्या ठिकाणी स्पर्श करत होता असाही आरोप त्या भोंदूबाबावरती आहे. अंनिसचे काही जण तिथे आल्यानंतर त्यांनी पाहिलं तो भोंदू बाबा एका महिलेला हाताने मारहाण करत होता, त्यानंतर तो एका व्यक्तीला काठीने मारायला लागला. तिथे एक माणूस आला होता त्याला भूतबाला झाली म्हणून त्याला देखील काठीने मारलं. त्यानंतर त्याला तोंडात बूट धरायला लावला. त्यानंतर त्याला खाली गवतात झोपवलं आणि त्याच्या गळ्यावरती बुटासह पाय दिला, त्यानंतर मंदिराभोवती पाच चक्रा मारायला लावल्या, अशी माहिती अंनिसच्या लोकांनी दिली आहे.

स्वतःचा बूट तोंडात धरायला लावायचा….

हा भोंदूबाबा मुल होत नाही, लग्न होत नाही, दारू सोडत नाही, अंगात भूतबाधा झाली आहे, अशा नागरीकांना मग ती महिला असो वा पुरुष तो त्याना काठीने मारायचा. स्वतःचा बूट तोंडात धरायला लावायचा आणि मंदिराला गोल चकरा मारायला लावायचा. झाडाची पानं खायला द्यायचा. एवढेच नव्हे तर लघु शंका करून तो पिण्यासही देत असे. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. हा बाबा फरार झाला आहे, त्याचा शोध सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर गावातील एका घटनेमुळे पुन्हा उपस्थित झाला आहे. मूल होत नाही, लग्न होत नाही, दारू सोडत नाही, अंगात भूतबाधा झाली आहे अशा समस्या घेऊन आलेल्या नागरिकांवर संजय रंगनाथ पगार नावाचा बोंदूबाबा अघोरी कृत्य करत होता. तो लोकांना काठीने मारहाण करायचा, स्वतःचा बूट तोंडात धरायला लावायचा आणि लघुशंका प्यायला द्यायचा. महिलांनाही नको त्या ठिकाणी स्पर्श करत असल्याचा आरोप आहे. अंनिसला (महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती) या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच बोंदूबाबा भक्तांसह फरार झाला. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. यापूर्वीही एका महिलेने या बाबाविरोधात तक्रार दिली होती, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप तिने केला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, “मी तक्रार पोलीस स्टेशनला केली होती आणि मी ग्रामसभेत पण विषय घेतला होता. मी दोन तीन वेळा गेले पण त्यांनी माझं काही मनावरच घेतलं नाही.” संजय पगार, वय 48 ते 50 वर्षे, शिऊर गावचा रहिवासी आहे. लग्नाच्या वरातीत घोडे पुरवण्याचा त्याचा व्यवसाय होता. गेल्या काही वर्षांपासून तो बिरोबा मंदिरात दरबार भरवून रविवारी आणि गुरुवारी असे अघोरी प्रकार करत होता. एबीपी माझा अशा बुआ बाबांच्या नादी न लागता डॉक्टरांकडे उपचार घेण्याचे आवाहन करत आहे.

https://www.youtube.com/watch?v=RO671SETMU

आणखी वाचा

Comments are closed.