एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, आता महाजनांकडून जशास तसं उत्तर; म्हणा
Girish Mahajan on Eknath Khadse: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात राजकीय जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या सारखा मी वाया गेलो नाही. गिरीश महाजन किती वाया गेला हे तुम्हाला माहिती आहे. अनेक ठिकाणी त्यांनी संबंध ठेवले. संजय राऊत म्हणतात महाजन हे जामनेरचा सांड आहे. यावर मी नंतर बोलेल, असे म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला. आता एकनाथ खडसेंच्या टीकेवर गिरीश महाजनांनी जोरदार पलटवार केलाय.
गिरीश महाजन म्हणाले की, मी वाया गेलेला माणूस आहे असे खडसे म्हणाले. यावर काय बोलू? त्या माणसाला स्वतःचे चिन्ह काय आहे ते सध्या समजत नाही. भुसावळ, रावेर, मुक्ताईनगरला ते वेगळे सांगतात. जिथे जातील तिथे वेगळे सांगतात. काय होता माणूस, काय झाला, कसा वाया गेला? अख्या राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा काय वागतोय? आमच्या पक्षात तुमचा परिवार कसा घालतात, तुम्ही तुमचे काम करा ना.
Girish Mahajan on Eknath Khadse: त्यांना कमळात घ्यायचे असते तर कधीच घेतले असते
आमच्या ताई आहेत, त्या आमदारकीला दोन वेळा पडल्या. तुम्ही तुमच्या पक्षाचे काम करा. तुमच्या परिवारात चार पक्ष आहेत. सगळे चिन्ह झालेत. मलाही वाईट वाटते की, आम्ही सोबत काम केलं ते आमचे नेते होते. काय माणूस राजकारणात दुर्बुद्धी सुचली की कुठून कुठे जातो याचे उदाहरण म्हणजे खडसे आहे. लोकसभेला सुनेचे काम करतो, कमळ हाती घेतले. विधानसभा लागली तर तुतारी वाजवली. आता भुसावळला गेले तर म्हणतात घड्याळाला मतदान करा. कधी म्हणतात मशालीला मतदान करा. त्यांचा पक्ष कोणता हे कळत नाहीत. त्यांना चिन्ह कोणते हे विचारा. तब्येत, वयोमानानुसार ते बोलताय. त्यांना कमळात घ्यायचे असते तर कधीच घेतले असते, असे देखील गिरीश महाजन यांनी म्हटले.
Girish Mahajan on Eknath Khadse: माणूस इतका कसा लाचार होऊ शकतो?
गिरीश महाजन पुढे म्हणाले की, तब्येतीची काळजी घ्या. मानसिक अस्वस्थेमुळे ते बोलत आहेत. चार जणांनी चार पक्ष वाटून घेतले आहेत. रक्षा ताई आमच्या आहेत, त्या खासदार आहेत, मंत्री आहेत, पण तुम्ही कशाला येतात? एखाद्या गावात बँड वाजत असला तर दोन चार जण येतात तसे ते आले. बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना. त्यांचे अस्तित्व काही राहिले नाही. ते संपलेले आहेत. माणूस इतका कसा लाचार होऊ शकतो. सर्व पक्षाचे चिन्ह घेऊ शकतो. राजकारणात असा माणूस बघितला नाही, असे हल्लाबोल त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केलाय.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.