उद्धव ठाकरेंची मुलाखत येताच गिरीश महाजनांचा पुन्हा खळबळजनक दावा; म्हणाले, ठाकरे गटाचे खासदार…
उधव ठाकरे वर गिरीश महाजन: शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाचे संपादक आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. आता यावर मुलाखतीवरून भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रहार केलाय. तसेच काही दिवसांपासून गिरीश महाजन यांनी शिवसेना जमीनदोस्त करू, असा दावा केला होता. आता उद्धव ठाकरेंची मुलाखत समोर येताच गिरीश महाजन यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संपर्कात असल्याचा दावा केलाय. गिरीश महाजन यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, ठाकरे ब्रँड हा बाळासाहेबांच्या सोबतच संपला आहे. सध्या संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची सुरू असलेली मुलाखत ही जनतेसाठी करमणूक आहे. ठाकरेंची मुलाखत संजय राऊत घेतात हा सगळा मॅनेज शो आहे. ही मुलाखत दुसऱ्या कोणी घेतली असती तर वेगळा भाग होता. मात्र, सध्या सुरू असलेली ही मुलाखत जनतेसाठी मोठी करमणूक असल्याची टीका त्यांनी केली आहे.
ठाकरेंचे खासदार संपर्कात, गिरीश महाजनांचा दावा
गिरीश महाजन पुढे म्हणाले की, पूर्वी तीन ते चार खासदार आमच्याकडे येणार होते. आता ही संख्या अजून वाढली आहे. आता यामध्ये अजून जास्त खासदारांची वाढ झाली असून हे सर्व विरोधी पक्षातील खासदार आहे. यात उद्धव ठाकरे यांच्या खासदारांची संख्या जास्त आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
गिरीश महाजनांचा विजय वडेट्टीवारांना टोला
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात हनी ट्रॅप प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. आजी-माजी अधिकारी आणि काही बडे नेते हनी ट्रॅपमध्ये अडकले असून या हनी ट्रॅपचा सूत्रधार नाशिकचा असल्याची चर्चा रंगली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना सध्या हनी ट्रॅपी प्रकरणाची चर्चा होतेय. पण ना हनी आहे ना ट्रॅप, असे वक्तव्य केले होते. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाशिकच्या हनी ट्रॅपची सीडी आमच्याकडे असल्याचा दावा केला आहे. मागील काळात जी काही सत्तापालट झाली ती देखील अशाच सीडीमुळे झाली, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. याबाबत गिरीश महाजनांना विचारले असता शिंदे यांचे सरकार कुठल्या सीडी आणि पेन ड्राईव्हवर आले, अशी हास्यास्पद विधाने विरोधी नेते करीत असून ही सीडी दाखवा. मग सर्व राज्याला खरे काय ते कळेल? असा टोला त्यांनी विजय वडेट्टीवार यांना लगावला आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.