पतीला नोकरी लावण्याचं आमिष अन् तिची नोकरी घालवण्याची धमकी; हायवेवरील हॉटेलमध्ये…प्रफुल लोढाच्
पुणे: हनी ट्रॅप प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या प्रफुल लोढाच्या विरोधात बावधन पोलिसांनी (Pune Crime News) बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. एका 36 वर्षीय महिलेच्या नवऱ्याला नोकरी लावण्याच्या अमिषाने प्रफुल लोढाने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला आहे. 27 मे रोजी रात्री पुण्यातील बालेवाडी भागातील पुणे-बेंगलोर महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये प्रफुल लोढाने हा प्रकार केल्याचा आरोप आहे. संबंधित महिलेने पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर 17 जुलैला लोढाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बावधनचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी माहिती दिली आहे. प्रफुल लोढाला पिंपरी चिंचवड पोलीस अटक करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.(Pune Crime News)
जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याची तक्रार
बावधनचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधान पोलिस स्टेशनच्या हद्दीत 17 जुलै रोजी प्रफुल लोढा यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे, आरोपी सध्या मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे. आरोपीचं ट्रान्सफर वॉरंट घेऊन आपल्याकडील गुन्ह्यात इकडे ट्रान्सफर करून आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या पतीला नोकरी लावतो असं आमिष दाखवून जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याची तक्रार आहे. तिच्या पतीला नोकरी लावतो असं सांगून तिच्याशी संबंध ठेवले त्याचबरोबर संबंध ठेवण्यासाठी साथ दिली नाही तर तिची नोकरी देखील घालवण्याची धमकी लोढाने तिला दिली होती, तक्रारदार महिला ही घरामध्ये एकटीच कमावती आहे, आम्ही घटनास्थळाची पाहणी केली आहे. ही घटना 27 मे रोजी रात्री पुण्यातील बालेवाडी भागातील पुणे-बेंगलोर महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये घडली आहे. घटनेचा तपास सुरू आहे, घटना इतक्या उशीरा तक्रार का दिली याबाबतचा तपास सुरू आहे.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल
‘हनी ट्रॅप’सह एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर काम देण्याच्या आमिषाने अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात बलात्कारप्रकरणी गुन्हा बावधन पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यानंतर आता पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर 17 जुलैला लोढाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रफुल्ल लोढा (वय 62, रा. जामनेर, जि. जळगाव) याच्यावर मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात नोकरीचे आमिष दाखवून 16 वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलींचे अश्लील छायाचित्र काढून, मुलींना डांबून ठेवून त्यांना धमकावल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. 3 जुलै रोजी साकीनाका पोलिस ठाण्यात पोस्को, बलात्कार, खंडणी, फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे, तर 14 जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ‘पोस्को ‘सह बलात्कार आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकीनाका पोलिसांनी लोढा याला 5 जुलै रोजी अटक केली आहे. आता त्याच्यावर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत बावधन पोलिस ठाण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोथरूड येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.