स्फोट अन् सर्वत्र मृतदेहांचा खच, फायर ब्रिगेड आत जाताच दिसलं भयंकर दृश, गोव्यातील नाईट क्लबमध्य


पणजी: गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण (Goa Night Club Fire) आगीत क्षणार्धात 25 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आगीनंतर झालेल्या मोठ्या स्फोटामुळे (Goa Night Club Fire) परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग विझवल्यानंतर, अग्निशमन दल आणि पोलिसांची टीम नाईटक्लबमध्ये (Goa Night Club Fire) दाखल झाली. आतले दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला. आत मृतदेहांचा ढीग पडला होता. बहुतेक मृतदेह स्वयंपाकघराच्या परिसरात आढळले. मृतांमध्ये तीन महिला आणि २० पुरुषांचा समावेश होता, त्यानंतर पुन्हा दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये पर्यटकांसह रेस्टॉरंट आणि क्लबमध्ये काम करणारे स्थानिक कर्मचारी देखील होते.(Goa Night Club Fire)

Goa Fire News: रात्री १२:०० च्या सुमारास आग लागल्याची माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस नियंत्रण कक्षाला रात्री १२:०४ च्या सुमारास आग लागल्याची माहिती देणारा फोन आला. पोलिस, अग्निशमन विभाग आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न ताबडतोब सुरू झाले, परंतु आतील दृश्य भयानक होते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ते आत गेले तेव्हा धुराचे लोट आणि जमिनीवर पसरलेले मृतदेह दिसले. एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की त्यांना प्रथम मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला, त्यानंतर रुग्णवाहिका आणि पोलिस आले. लोक पोहोचेपर्यंत आग बरीच पसरली होती आणि बचावकार्य सुरू होते.

Goa Fire News: सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले

भाजप आमदार मायकल लोबो यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आणि म्हटले की, गोवा नेहमीच एक सुरक्षित पर्यटन स्थळ मानले गेले आहे. परंतु अशा घटना अत्यंत चिंताजनक आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी राज्यातील सर्व क्लब आणि रेस्टॉरंट्सनी अनिवार्य सुरक्षा ऑडिट करावे, असे ते म्हणाले. गोव्याचे डीजीपी आलोक कुमार म्हणाले की, आगीची माहिती मिळताच बचाव पथके तात्काळ रवाना करण्यात आली. सर्व २३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आगीचे कारण सध्या अस्पष्ट आहे, परंतु पोलिस सखोल तपास करत आहेत.

Goa Fire News: मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख

या घटनेवर दुःख व्यक्त करताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मृतांच्या कुटुंबियांना सांत्वन दिले. त्यांनी सांगितले की ही राज्याच्या पर्यटन इतिहासातील सर्वात मोठ्या घटनांपैकी एक आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. स्थानिक प्रशासनाने मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, तर जखमी आणि बाधित लोकांसाठी मदत केंद्रे सुरू केली जात आहेत. या घटनेमुळे अर्पोरा परिसरातील सुरक्षा आणि देखरेख यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.