जागतिक तणावाच्या वातावरणात सोने खरेदी करावं की विक्री करावी? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
मुंबई : सोन्याच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चढ उतार सुरु आहेत. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार 999 शु्द्धता सोन्याचा 10 ग्रॅमचा सोन्याचा दर 9 मे रोजी 96416 रुपये होता. तो 12 मे रोजी 93080 रुपयांवर आला होता, त्यानंतर पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होऊन ते 94344 रुपयांवर पोहोचलं. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जूनच्या सोन्याच्या वायद्यात तेजी पाहायला मिळाली. 12 मे 3.79 टक्के घसरुन सोन्याचा दर 92860 रुपयांवर होता. मंगळवारी म्हणजे 13 मे रोजी सोन्याचा दर 94070 रुपयांवर पोहोचला आहे.
वे टू वेल्थच्या रिपोर्टनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 12 मे रोजी 3 टक्के घसरण झाल्यानं ते एका महिन्याच्या निचांकी पातळीवर पोहोचले होते. याचं मुख्य कारण अमेरिका आणि चीन यांच्यात 90 दिवसांच्या टॅरिफ कपातीवर समझोता झाला आहे. यामुळं गुंतवणूकदार शेअर बाजारासारख्या जोखमीच्या संपत्तीमध्ये गुंतवणूक करु शकतात.
मोतीलाल ओसवाल रिसर्च हेडचे नवनीत दमानी यांच्या मते आगामी काळात सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, आम्हाला वाटतं की आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं अजून स्वस्त होईल. देशांतर्गत बाजारात देखील सोन्याचे दर 90000-91000 रुपयांदरम्या असतील. भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी झाल्यानं हे शक्य असल्याचं ते म्हणाले.
वे 2 वेल्थच्या टेक्निकल अनॅलिसिस येत्या काळात एमसीएक्सवर सोन्याच्या दरात अस्थिरता राहू शकते. सध्या सोन्याचे दर 92200 ते 97000 रुपयांदरम्यान आहेत.काही तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या दरात घसरण होत असली तरी दीर्घकालीन विचार केला असता स्थिती सकारात्मक आहे. इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष अक्षा कंबोज म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्थिती महागाई कमी झाली असेल, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत चांगले संकेत असले तरी घसरण झाली असेल. मात्र, केंद्रीय बँकांची खरेदी, जागतिक अनिश्चितता, व्याज दरांमधील कपात दीर्घकालीन विचार केला असता सोन्याच्या तेजीच्या बाजूनं स्थिती आहे.
भारतात आगामी काळात सण आणि लग्नांच्या हंगामामुळं देशांतर्गत मागणी स्थिर झली आहे. येत्या काही तिमाहींमध्ये किंमत स्थिर होऊन मजबूत होऊ शकते. गुंतवणूकदारांनी रिटेल गुंतवणूकदार म्हणून सोन्याकडे दीर्घकालीन असेट म्हणून पाहावं. तात्काळ नफा देणारं साधन म्हणून पाहू नये. सध्याची घसरण दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हळू हळू खरेदीची संधी असू शकते, असं अक्षा कंबोज म्हणाल्या. दमानी यांनी गुंतवणूकादरांना सोन्याचे दर 90 हजारांवर असताना गुंतवणुकीचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय चांदी देखील खरेदी करावी, असा सल्ला दिला आहे. दुसरीकडे आर्थिक सल्लागारांकडून पोर्टफोलिओत 10-15 टक्के वाटा सोन्याचा असला पाहिजे, असं सांगण्यात आलंय.
अधिक पाहा..
Comments are closed.