24 कॅरेट सोन्यानं तोळ्यामागं लाखांचा टप्पा ओलांडला, 19 जुलै रोजी 10 ग्रॅमचा दर किती? तपासा
आज सोन्याचे दर: जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक असलेल्या भारतात गेल्या काही दिवसांपासून सोन्या – चांदीच्या दरात मोठी चढ-उतार होताना दिसतेय . आंतरराष्ट्रीय आर्थिक अस्थिरता आणि वाढत्या महागाईच्या काळात भारतातील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे . 24 कॅरेट सोन्यासाठी प्रति तोळा दर लाखांच्या वर जाऊन पोहोचला आहे . तर 10 ग्रॅम मागे 98 हजार 260 रुपयांवर सोने गेले आहे . तर चांदीचा एका किलोमागे दर एक लाख 12 हजार 940 रुपयांवर गेलाय . आज सोन्याच्या दर्यात झालेल्या वाढीमुळे खरेदीदारांमध्ये संभ्रमावस्था आहे .सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याची भीती वर्तवली जातेय .
सोनं प्रति तोळा लाखांच्या वर ! 10 ग्रॅमला ..
आज (19जुलै) भारतात सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे .भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर तोळ्यामागे 1 लाख 14 हजार 699 वर गेला आहे . 10 ग्रॅममागे 98 हजार 260 रुपये झालाय . काल (18 जुलै ) रोजी सोन्याचा तोळ्याचा दर 99490 इतका होता . आज या दरात वाढ झाली आहे .
22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना दहा ग्रॅम मागे 90 हजार 72 रुपये भरावे लागणार असून तोळ्यामागे 22 कॅरेट सोन्याला एक लाख 5 हजार 58 रुपये दर झाला आहे .सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे .गेल्या आठवड्यात दहा ग्रॅम मागे 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 98 हजार 30 रुपये एवढा होता . तो आज 98 हजार 260 रुपये एवढा झालाय .महिन्याभरापूर्वी 99 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा सोन्याचा भाव होता .
चांदीचा विक्रमी उच्चांक
शनिवारी ( 19 जुलै ) भारतात चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे .गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या किमतींचा आलेख हा वाढता आहे .आज 1 kg चांदीची किंमत एक लाख 12 हजार 940 रुपये एवढी झाली आहे .वाढत्या भू-राजकीय अनिश्चिततेमुळे आणि चांदीच्या वाढत्या औद्योगिक मागणीमुळे संपूर्ण भारतात चांदीच्या किमती वाढत आहेत. याव्यतिरिक्त, सोन्याच्या तुलनेत चांदीचे आकर्षक मूल्यांकन इतर मालमत्तेतील अस्थिरतेतून वाचण्यासाठी एक सुरक्षित मालमत्ता बनवते.
सराफा बाजारात सोन्याचा दर 2025 या वर्षात 22088 रुपयांनी वाढले तर चांदीचे दर 26283 रुपयांनी महागले आहेत. 31 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर 76045 रुपये प्रतितोळा होता. तर, चांदीचे दर 85860 रुपये प्रति किलो होते. तेव्हापासून जगभरातील आर्थिक घडामोडी, डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण आणि शेअर बाजारातील अनिश्चितता यामुळं सोने आणि चांदीच्या गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. भारतात विविध सण आणि लग्नसराईच्या काळात सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते.
हेही वाचा
https://www.youtube.com/watch?v=WWHJA33JCNS
आणखी वाचा
Comments are closed.