Gold Racket: मुंबईत सोनं तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 11जणांना अटक, 15 कोटींचं सोनं जप्त
मुंबई सोन्याच्या तस्करीचे रॅकेट मुंबईत (Mumbai) सोनं तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) मोठं यश मिळवा झाले आहे. ‘ऑपरेशन बुलियन ब्लेझ’ अंतर्गत मुंबईत मोठी कारवाई करत सोनं तस्करी करणाऱ्या रॅकेटचा (सोन्याच्या तस्करीचे रॅकेट) उघड करण्यात आला आहे. या कारवाईत 11 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 11.88 किलो सोनं, ज्याची किंमत 15 कोटी रुपये आहे असल्याची माहिती आहे. या सोबतच 8.77 किलो चांदी देखील जप्त करण्यात आली आहे.
परदेशातून तस्करी (Gold Smuggling) करून आणलेले सोने गुप्त भट्ट्यांमध्ये वितळवून स्थानिक बाजारपेठेत विकले (Crime) जात असल्याची माहिती डीआरआयच्या (DRI Operation Bullion Blaze) तपासात समोर आली आहे. डीआरआयने दोन अवैध वितळवणी युनिट्सवरही छापे टाकले असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा आणि तस्करीच्या नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.
ऑपरेशन बुलियन अंतर्गत ड्रायपर ब्लेझी अंतर्गत एस बिग कॅरोइन ब्लेझी
मिळालेल्या माहितीनुसारमहसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) “ऑपरेशन बुलियन ब्लेझ” अंतर्गत मुंबईत मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेल्या सुव्यवस्थित सोन्याच्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी परदेशातून सोने भारतात तस्करी करून, गुप्त भट्ट्यांमध्ये वितळवून ते स्थानिक बाजारपेठेत बेकायदेशीरपणे विक्री करत होती. विशिष्ट माहितीच्या आधारे, 10 नोव्हेंबर 2025 रोजी DRI अधिकाऱ्यांनी मुंबईतील चार ठिकाणी एकाचवेळी कारवाई केली. ज्यामध्ये दोन अवैध वितळवणी युनिट्स आणि दोन अनधिकृत दुकाने आढळून आले. तसेच दोन्ही भट्ट्या पूर्णपणे कार्यरत अवस्थेत सापडल्या असून, वितळवणीसाठी आवश्यक सर्व साधनसामग्री उपलब्ध होती. DRI पथकाने तत्काळ कारवाई करून ठिकाणावरील ऑपरेटरला ताब्यात घेतले व सुमारे 6.35 किलो सोने जप्त केले.
त्यानंतरच्या कारवाईत, तस्करी केलेले सोने स्वीकारणे आणि वितळवलेले सोन्याचे बार स्थानिक खरेदीदारांना विकणे या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन दुकानांवर छापे टाकण्यात आले. त्यापैकी एका दुकानातून 5.53 किलो सोन्याचे बार जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण 11.88 किलो (24 कॅरेट) सोने ज्याची किंमत अंदाजे ₹15.05 कोटी रुपये आहे आणि 8.72 किलो चांदी (किंमत ₹13.17 लाख रुपये) जप्त करण्यात आली. सर्व मालमत्ता कस्टम्स अॅक्ट, 1962 अंतर्गत जप्त करण्यात आली.
आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक, सरकारी महसूल फसविण्याच्या उद्देशाने कार्यरत?
या कारवाईत आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक करण्यात आली असून, त्यात टोळीचा मास्टरमाइंड, त्याचे वडील, व्यवस्थापक, चार वितळवणी कामगार, तस्करीच्या सोन्याचे लेखाजोखा ठेवणारा अकाउंटंट आणि तीन वितरण कर्मचारी यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना मुंबईतील माननीय दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासातून असे स्पष्ट झाले आहे की, ही टोळी भारताच्या सोन्याच्या आयात धोरणाचे उल्लंघन करून, सरकारी महसूल फसविण्याच्या उद्देशाने कार्यरत होती.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.