‘खासदार श्री’च्या संघर्षात हरमित सिंगची सरशी

मुंबईच्या शरीरसौष्ठवाची अस्सल श्रीमंती दाखवणारी 300पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये रंगलेल्या अटीतटीच्या पोझयुद्धात शरीरसौष्ठवपटू हरमित सिंग हा ‘खासदार श्री’चा किंग ठरला. त्याने मुंबई श्रीचा किताब पटकावणाऱया उमेश गुप्ता, नीलेश दगडे, नीलेश रेमजे, अक्षय मोगरकर यांची कडवी लढत मोडून काढत लाखमोलाच्या स्पर्धेवर आपले नाव कोरले.

बोरिवली पश्चिमेकडील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत खेळाडूंच्या विक्रमी सहभागामुळे प्रत्येक वजनी गटात 40 ते 50 खेळाडूंची गर्दी पाहून प्रेक्षकही अवाक झाले. परीक्षकांनाही निकाल जाहीर करताना अक्षरशः डोळ्यात तेल घालून निर्णय घ्यावे लागले. मुख्य शरीरसौष्ठवाप्रमाणे मेन्स फिजिक फिटनेस गटातही स्पर्धकांच्या सहभागाने सेंच्युरी गाठत विक्रम केला. या दोन गटांच्या स्पर्धेतील 165 सेमी गटात अनिश शिंदे, तर 165 सेमीवरील गटात बॉबी पाटील विजेता ठरला. महिला शरीरसौष्ठव गटात लवीना नरोन्हाने अव्वल स्थान पटकावत उपस्थितांची वाहवा मिळवली.

खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा निकाल

n ५५ किलो वजनी गट ः 1. जीवन सूर्यवंशी (स्ट्रेंथ यार्ड), 2. रुनिक शिरपे (स्नायू बांधणे), 3. राहुल भारद्वाज (एबी फिटनेस); n ६० किलो: 1. हनुमान भगत (शेळके जिम), 2. गणेश पाटील (फिजिक जिम), 3. धर्मराज जमादार (MJ 22); n ६५ किलो: 1. संदीप सावळे (परब फिटनेस), 2. सुयश सावंत (शिवशक्ती), 3. निखिल सावंत (आयक्यू फिटनेस); n 70 किलो: 1. उमेश गुप्ता (युजी फिटनेस), 2. साजिद मलिक (विराज फिटनेस), 3. उदेश ठाकूर (रूद्रा फिटनेस); n 75 किलो: 1. एम.के. राजू (स्ट्रेंथ यार्ड), 2. विशाल धावडे (बालमित्र जिम), 3. सुरेंद्र नाईक (परब फिटनेस); n 80 किलो: 1. पवन डंबे (श्री दत्तगुरू), 2. ऋतिक पालव (बॉडी वर्कशॉप), 3. नैतिक गांधी (संध्या फिटनेस); n 80 किलोवरील ः1. हरमित सिंग (परब फिटनेस), 2. नीलेश दगडे (परब फिटनेस), 3. अक्षय मोगरकर (हर्क्युलस जिम); n पुरुषांची शरीरयष्टी १६५ सेमी: 1. अनिश शिंदे (विराज फिटनेस), 2. सागर शहा (शिवशक्ती), 3. महेश (नॅन्सी जिम);  n पुरुषांची शरीरयष्टी १६५ सेमी वरील ः 1. बॉबी पाटील (वेलनेस जिम), 2. संतोष पुजारी (सद्गुरू फिटनेस), 3. संकेत शिगवण (फिट अँड फाइन).

महिला शरीरसौष्ठव – 1. लविना नोरोन्हा (जे नाईन) 2. राजश्री मोहिते (केंजो फिटनेस), 3. पूजा चोटमल (माँसाहेब).

खासदार श्री विजेता – हरमित सिंग, उपविजेता – उमेश गुप्ता, द्वितीय उपविजेता – संदीप साळवे.

Comments are closed.