Harshvardhan Sapkal demands action against those who threatened Indrajit Sawant
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ चित्रपटाविषयी भूमिका मांडताना इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी केलेल्या विधानावरून त्यांना धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी आता ‘घाशीराम कोतवाल करे सो कायदा’ हे महाराष्ट्रात चालणार नाही, असा इशारा काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिला आहे.
मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ चित्रपटाविषयी भूमिका मांडताना इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी केलेल्या विधानावरून त्यांना धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. धमकीची ऑडिओ क्लीप इंद्रजीत सावंत यांनी फेसबूकवर टाकली आहे. तसेच प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिल्याचा दावा सावंत यांनी केला आहे. प्रशांत कोरटकर यांनी आरोप फेटाळले असले तरी त्यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी आता ‘घाशीराम कोतवाल करे सो कायदा’ हे महाराष्ट्रात चालणार नाही, असा इशारा काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिला आहे. (Harshvardhan Sapkal demands action against those who threatened Indrajit Sawant)
इंद्रजीत सावंत यांना आलेल्या धमकीप्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देताना वापरलेली भाषा आणि त्याचा आशय पाहता सरकार कोणत्या विचाराच्या लोकांना पुढे करत आहे हे दिसून येते. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील “छावा” चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी काँग्रेसने शिवजयंती दिनी केली होती, पण त्यावर सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा – Swargate Rape Case : स्वारगेटची घटना क्लेशदायक, पालकमंत्री अजित पवारांनी केली ही घोषणा
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, संभाजी महाराजांबद्ल सरसंघचालक गोळवलकर यांनी ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकात आणि सावरकरांनीही आक्षेपार्ह लेखन केले आहे. चिटणीसाच्या बखारीपासूनचा जो खेळ सुरू आहे त्याची पाठराखण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची या विषयावर चुप्पी आहे का? छावा चित्रपट प्रमोट करण्यात कुचराई करत आहेत का? असे प्रश्न असताना इतिहास अभ्यासक इंद्रजीत सांवत यांना ‘हे राज्य आमचे आहे’ अशी धमकी दिली जाते. त्यामुळे मला विचारायचे आहे की, महाराष्ट्रात घाशीराम कोतवालाचे राज्य आहे का? जर घाशीराम कोतवाल महाराष्ट्राचा गृहविभाग चालवत असतील, तर ते कदापी खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा सपकाळ यांनी दिला.
घाशीराम कोतवाल करे सो कायदा महाराष्ट्रात चालणार नाही
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. परंतु हा धमकी देणारा पोलिसांच्या विश्रामगृहावर कसा थांबतो? त्याला सुरक्षा कशी पुरवण्यात आली? कोण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना या व्यक्तीची संपत्ती किती वाढली? हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे घाशीराम कोतवालाचे बगलबच्चे जर धमक्या देत असतील तर ते गंभीर आहे. याची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ‘हम करे सो कायदा’ आणि ‘घाशीराम कोतवाल करे सो कायदा’ हे महाराष्ट्रात चालणार नाही, अशा शब्दात हर्षवर्धन सपकाळ धमकीप्रकरणावर संताप व्यक्त केला.
हेही वाचा – Supriya Sule : पुण्यातील घटना कायद्याची दुर्दशा दर्शवणारी, सुप्रिया सुळेंचा संताप
Comments are closed.