SIR प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी
नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने 9 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदारयादी फेरपडताळणी (एसआयआर) प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये एसआयआर विरोधात द्रमुक, माकप आणि काँग्रेस, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून यावर मंगळवारी सुनावणी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी निवडणूक आयोगाला 2 आठवड्यांमध्ये भूमिका मांडण्यास सांगितले आहे. तर एसआयआर प्रक्रियेचे समर्थन करणाऱ्या अण्णाद्रमुकच्या दखल याचिकेला न्यायालयाने मंजुरी दिली आहे.
Comments are closed.