कसोटी मालिका संपली, आता अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिका रंगणार; रोहित मैदानात दिसणार, पाहा टीम इ

भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय बातम्या : मुल्लांपूर (न्यू चंदीगड) येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 6 जूनपासून खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकमेव कसोटी सामन्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागला. भारतीय संघाने अफगाणिस्तानचा डाव आणि तब्बल 300 धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा सर्वात मोठा शिल्पकार ठरला पदार्पणवीर मानव सुधार. युवा फिरकीपटूने पहिल्या डावात 6 बळी घेत अफगाण फलंदाजांचे कंबरडे मोडले. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने 1 विकेट घेतली. संपूर्ण सामन्यात 7 बळी घेण्याबरोबरच त्याने फलंदाजीतही उपयुक्त योगदान दिले. त्यामुळे पदार्पणाच्या सामन्यातच त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

कसोटी मालिका संपली, आता अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिका रंगणार (India vs Afghanistan ODI Update)

कसोटी मालिका संपल्यानंतर आता भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका देखील भारतातच होणार असून क्रिकेट चाहत्यांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता आहे. वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज विराट कोहली दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. मात्र, कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या संघात खेळताना दिसू शकतात. त्यामुळे भारतीय संघाची ताकद कायम राहणार आहे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान वनडे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक (India vs Afghanistan ODI Schedule Update)

पहिला वनडे – तारीख: 13 जून
वेळ: दुपारी 1:30 वाजता
स्थळ: हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला

दुसरा वनडे – तारीख: 17 जून
वेळ: दुपारी 1:30 वाजता
स्थळ: भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम, लखनऊ

तिसरा वनडे – तारीख: 20 जून
वेळ: दुपारी 1:30 वाजता
स्थळ: एम. ए. चिदंबरम (चेपॉक) स्टेडियम, चेन्नई

सर्व सामन्यांमध्ये नाणेफेक (टॉस) दुपारी 1 वाजता होईल, तर खेळाची सुरुवात 1:30 वाजता होणार आहे.

सामने कुठे पाहता येणार?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील वनडे मालिकेचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तसेच मोबाईल आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामने जिओहॉटस्टारवर थेट पाहता येणार आहेत. कसोटीत अफगाणिस्तानवर एकहाती वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ आता वनडे मालिकेतही विजयाची परंपरा कायम ठेवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. दुसरीकडे, कसोटीतील पराभव विसरून अफगाणिस्तानचा संघ वनडेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे ही मालिका क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक ठरण्याची शक्यता आहे.

भारत आणि अफगाणिस्तान संघ

भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे.

अफगाणिस्तान संघ : हशमतुल्ला शाहिदी (कारधर), रेहमानुल्ला गुरबाज (यश्तीरक्ष), इब्राहिम जद्रान, सेदीकुल्ला अटल, दरविश रसूल, रहमत शाह, इक्रम अलीखिल (यश्तीरक्ष), मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, नांग्याल खरोताई, मलिक शरीफ, जम्मान्फर मलिक, रेहमानुल्लाह, रेहम्नूर बिलाल सामी.

राखीव खेळाडू : कैस अहमद, सलीम साफी, बशीर अहमद.

हे ही वाचा –

Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर ‘तांडव’; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!

Comments are closed.