टीम इंडियात इंग्लंड दौऱ्यात कुणाला संधी, 15 सदस्यांच्या टीममध्ये कोण स्थान पटकवणार, कॅप्टन कोण

इंग्लंडसाठी भारत पथक 5 सामना कसोटी मालिका नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीम पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पहिली कसोटी 20 जूनपासून सुरु होणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघाची ही पहिली मालिकी आहे. या मालिकेत टीम इंडियाला कसोटी संघासाठी नवा कर्णधार मिळेल. रिपोर्टनुसार शुभमन गिल टीम इंडियाचा कॅप्टन होईल. रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल यापैकी उपकर्णधार केलं जाऊ शकतं. जसप्रीत बुमराहचा फिटनेस योग्य नसल्यानं तो कर्णधारपदाच्या शर्यतीतून बाहेर आहे.

या खेळाडूंना मिळणार संधी?

इंग्लंड विरुद्ध च्या कसोटी मालिकेत साई सुदर्शनला संधी मिळू शकते. साई सुदर्शननं आयपीएल 2025 मध्ये दमदार कामगिरी केली आहे. यशस्वी जयस्वाल सह तो डावाची सुरुवात करु शकतो. श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळू शकतं. मोहम्मद शमीला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.

वेगवान गोलंदाजी जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा करतील. 15 सदस्यांच्या टीममध्ये दोन फिरकीपटू असतील. इंग्लंड दौऱ्यासाठी 20 खेळाडूंच्या नावांची निवड केली जाईल. त्यापैकी 15 जणांची संघात तर 5 जण ट्रॅव्हल रिझर्व्ह असतील.

संभाव्य टीम इंडियाः शुबमन गिल (कर्नाधार), यशसवी जैस्वाल, साई सुदर्शन, केएल राहुल, ish षभ पंत (विकेटकीपर), ध्रुव ज्युरेल (विकेटकीपर), श्रेयस इयर, सारफराज खान, नितिश कुमार रेडी, जसप्रिट रानैत राणा, रवींद्र जडेजा कुलदीप यादव.

संभाव्य ट्रॅव्हल रिझर्व्ह – आकाशदीप, शार्दुल ठाकुर, करुण नायर, वॉशिंगटन सुंदर आणि देवदत्त पडिक्कल

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामुळं तीन जणांची निवृत्ती

भारतानं 2024 च्या अखेरच्या महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी दौरा केला होता. भारताला त्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागला होता. भारतानं केवळ एक कसोटी जिंकली होती. त्याचं नेतृत्त्व जसप्रीत बुमराहनं केलं होतं. त्यानंतर भारताला पुन्हा विजय मिळवता आला नाही. त्या मालिकेत आर. अश्विननं निवृत्ती जाहीर केली होती. आता इंग्लंड दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं निवृत्ती जाहीर केली. त्यामुळं टीम इंडियाला युवा खेळाडूंवर विश्वास ठेवून इंग्लंडचा दौरा करावा लागेल. नवा कर्णधार म्हणून शुभमन गिलचं नाव आघाडीवर आहे. आता संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय.

हेदेखील वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.