शुबमन गिल संघाबाहेर? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताची चिंता वाढली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रविवारी दुबईमध्ये खेळला जाईल. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता संघ शेवटचा गट सामना खेळेल. याआधी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका वृत्तानुसार, सलामीवीर शुबमन गिल आजारी पडला आहे. तो सराव सत्रातही सहभागी झाला नाही. गिलच्या आधी रिषभ पंत आजारी पडला होता. मात्र, तो आता मैदानात परतला आहे.

टीम इंडिया सध्या दुबईमध्ये आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी दररोज सराव करत आहे. पण गिल बुधवारी सरावासाठी मैदानावर पोहोचला नाही. क्रीडा पत्रकार अभिषेक त्रिपाठी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून गिल आजारी असल्याची माहिती दिली. या कारणास्तव, तो सरावासाठी आला नाही. तथापि, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या प्रकरणावर कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही.

भारत-न्यूझीलंड सामन्याला अजूनही तीन दिवस शिल्लक आहेत. जर शुबमन गिल सामन्यापूर्वी तंदुरुस्त राहिला तर तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. जर तो बरा नसेल तर टीम इंडिया त्याला ब्रेक देऊ शकते. शुबमनने बांगलादेशविरुद्ध शानदार कामगिरी केली होती आणि शतक ठोकले होते. भारताने बांग्लादेशचा 6 विकेट्सने पराभव केला.

जर आपण ग्रुप अ च्या पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर न्यूझीलंड अव्वल स्थानावर आहे. तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. तर बांगलादेश तिसऱ्या आणि पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. हे दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. ग्रुप बी बद्दल बोलायचे झाले तर, दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे आणि अफगाणिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे. या गटातील कोणताही संघ अद्याप उपांत्य फेरीत पोहोचलेला नाही. इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडला.

हेही वाचा-

अफगाणिस्तान-इंग्लंडचा रोमांचक सामना: 642 धावा आणि विक्रमांचा पाऊस!
CT 2025; पाकिस्तान-बांग्लादेश प्रतिष्ठा राखण्यासाठी भिडणार, दोन्ही संघ आधीच बाहेर
इब्राहिम झद्रान आहे कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक; जाणून घ्या एकूण संपत्ती

Comments are closed.