पहिले टी ब्रेक, मग लंच ब्रेक…; भारत-दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु


भारत वि एसए कसोटी मालिका २०२५: भारत आणि दक्षिण अफ्रिका (India vs South Africa) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. यामधील पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. कोलकातामधील ईडन गार्डन्स मैदानावर भारत आणि दक्षिण अफ्रिकेचा पहिला सामना (India vs South Africa 1st Test) खेळवला जाईल. तर दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळवला जाईल. पहिला कसोटी सामन्याला भारतीय वेळेनूसार सकाळी 9.30 वाजता सुरुवात होईल. परंतु दुसरा कसोटी सामना सकाळी 9 वाजतापासून खेळवला जाईल.

भारतात कसोटी सामने साधारणपणे सकाळी 9.30 वाजता सुरू होतात. पहिले सत्र दोन तासांचे असते, त्यानंतर 40 मिनिटांचा लंच ब्रेक आणि दुसरे सत्र दोन तासांचे असते. तिसरे सत्र 20 मिनिटांच्या चहापानानंतर सुरू होते. तथापि, दुसऱ्या कसोटीत असे होणार नाही. भारताचा एकच वेळ क्षेत्र आहे आणि गुवाहाटी देशाच्या ईशान्य भागात आहे. म्हणूनच येथे सूर्य लवकर उगवतो आणि लवकर मावळतो. सध्या सूर्य सकाळी 5.30 वाजता उगवतो आणि संध्याकाळी 4.30 वाजता मावळतो. म्हणूनच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना सकाळी 9 वाजता खेळण्यास सुरुवात होईल. नाणेफेक सकाळी 8.30 वाजता होईल.

दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिले टी ब्रेक, मग लंच ब्रेक- (Ind vs SA 2nd Test Series)

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सकाळी 11 वाजता चहापानाचा ब्रेक सुरू होईल आणि 20 मिनिटांनी खेळ पुन्हा सुरू होईल. दुपारी 1.20 वाजता लंच ब्रेक असेल. हा ब्रेक 40 मिनिटांचा असेल. त्यानंतर दुपारी 2 वाजता खेळ पुन्हा सुरू होईल आणि 4 वाजेपर्यंत चालेल. जर नियोजित षटके पूर्ण झाली नाहीत तर दिवसाचा खेळ अर्धा तास वाढवता येऊ शकतो.

बारसापारा स्टेडियमवर पहिला कसोटी सामना- (Ind vs SA 2nd Test Schedule And Time)

गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर हा पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असेल. कसोटी सामना आयोजित करणारे हे भारतातील 30 वे स्टेडियम असेल. 2017 मध्ये येथे पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला होता. आतापर्यंत येथे तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि दोन एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत.

भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक- (Ind vs SA Test Series Schedule)

पहिली कसोटी: 14-18 नोव्हेंबर (ईडन गार्डन्स)

दुसरी कसोटी: 22-26 नोव्हेंबर (एसीए स्टेडियम)

संबंधित बातमी:

Rohit Sharma-Virat Kohli: विराट कोहली अन् रोहित शर्माला बीसीसीआयचा थेट इशारा; टीम इंडियाकडून खेळायचे असेल तर…

Anaya Bangar: षटकारांचा वर्षाव, अनाया बांगरचा मैदानात धुमाकूळ; एका दिवसांत 23 मिलियनपेक्षा जास्त Views, पाहा VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.