भारताच्या महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास 125 कोटी रुपये देणार; BCCI ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या


IND W vs SA W फायनल वर्ल्ड कप 2025: महिला विश्वचषक 2025 च्या स्पर्धेतील अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण अफ्रिका (IND W vs SA W Final World Cup 2025) यांच्यात होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दुपारी 3 वाजता अंतिम सामन्याला सुरुवात होईल. भारत आणि दक्षिण अफ्रिका (IND W vs SA W Final) विश्वचषकातील पहिल्या जेतेपदासाठी मैदनात उतरतील. सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 125 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच विश्वचषक फायनलचे तिकीट मिळवले. दरम्यान, सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दरम्यान, या अंतिम सामन्याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, जर भारतीय महिला क्रिकेट संघाने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामना जिंकला, तर बीसीसीआय त्यांना 125 कोटी रुपयांचे मोठे बक्षीस देण्याची तयारी करत आहे. बीसीसीआय हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला पुरुष संघाइतकेच बक्षीस देण्याचा मानस आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, बीसीसीआय पुरुष आणि महिला खेळाडूंना समान वेतन देण्यावर विश्वास ठेवते. म्हणूनच, जर आमच्या महिला संघाने विश्वचषक जिंकला तर त्यांचे बक्षीस पुरुष संघापेक्षा कमी नसावे, यावर आम्ही चर्चा केली. दरम्यान, जेव्हा भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अमेरिकेत टी-20 विश्वचषक जिंकला तेव्हा बीसीसीआयने खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसह संपूर्ण संघाला 125 कोटी रुपयांचा मोठा बोनस दिला होता. जर महिला संघाने यावेळी विजेतेपद जिंकले तर त्यांना समान रक्कम म्हणजे 125 कोटी रुपये देणे हे भारतीय महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक पाऊल असेल. (BCCI ON IND W vs SA W Final World Cup 2025)

विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला आयसीसीकडून किती रुपये मिळणार? (Women World Cup 2025 Prize Money)

आयसीसीने स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जाहीर केले की, 2025 च्या महिला एकदिवसीय विश्वचषकातील विजेत्या संघाला आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम मिळेल. यावर्षी, विजेत्या संघाला 4.48 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे ₹39.55 कोटी मिळतील. ही बक्षीस रक्कम मागील विश्वचषक, 2022 च्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपेक्षा चार पट जास्त आहे.

भारताची संभाव्य Playing XI:

स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा/राधा यादव, क्रांती गौड, श्रीचरणी, रेणुका ठाकूर

दक्षिण आफ्रिकेची संभाव्य Playing XI:

लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, सुने लुस, अनेके बॉश/मसाबता क्लास, ॲने डेर्कसेन, मारिजान कॅप, सिनेलो जाफ्ता (विकेटकीपर), क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा.

भारताचा संपूर्ण संघ- (Team India Full Squad)

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष, रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा,  क्रांती गौड, श्री चरणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, उमा छेत्री, शेफाली वर्मा.

दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ- (South Africa Full Squad)

लार्वर वोलवर्ड (कर्नाधर), अयाबोंग खाका, क्लो ट्रेऑन, नादिन डी क्लार, मेरी कॅप, टाझमिन कॅप, ताझमिन कॅप, सिनालो जाफ्ता, नानकुला डार्क, ॲनी डेकल्प, ॲनेकॉन डार्क, ॲनेकॉन डार्कसेन, मस्सा, मस्सा, मस्सा.

संबंधित बातमी:

IND W vs SA W Final World Cup 2025: आजही अनेक भागात पाऊस; फायनलमध्ये पाऊस पडल्यास विश्वचषकाची ट्रॉफी कोणाला?, महत्वाची माहिती आली समोर

IND W vs SA W Final World Cup 2025: चक दे इंडिया…आज भारत अन् दक्षिण अफ्रिकेचा अंतिम सामना; विश्वचषक कोण जिंकणार, प्लेईंन इलेव्हन, खेळपट्टी अन् हवामान कसे असेल?, A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.