आजही अनेक भागात पाऊस; फायनलमध्ये पाऊस पडल्यास विश्वचषकाची ट्रॉफी कोणाला?, महत्वाची माहिती आली स


IND W vs SA W फायनल वर्ल्ड कप 2025: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चा अंतिम सामना (IND W vs SA W Final World Cup 2025) आज 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळवला जाईल. भारतीय महिला संघाचा सामना दक्षिण आफ्रिका (India W vs South Africa W Final) संघाशी होईल. हा अंतिम सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे, कारण विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत. त्यामुळे महिला क्रिकेटला एक नवीन विश्वविजेता मिळेल. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत पाऊस कोसळत आहे. आजही पहाटेपासून मुंबईतील अनेक भागात पाऊस आहे. त्यामुळे आजच्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये पाऊस पडल्यास, नेमका नियम काय?, विश्वचषकाची ट्रॉफी कोणाला मिळणार?, याबाबत माहिती समोर आली आहे.

फायनलमध्ये पाऊस पडल्यास विश्वचषकाची ट्रॉफी कोणाला? (Ind vs SA Final Navi Mumbai Weather Forecast 2 November)

फायनल सामना आज दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. एक्युवेदरच्या अंदाजानुसार, आज पावसाची शक्यता सुमारे 63 टक्के आहे, तर संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत ही शक्यता 50 टक्क्यांपर्यंत राहील. याच मैदानावर भारत-बांगलादेशचा लीग सामना पावसामुळे रद्द झाला होता. जर रविवारचा सामना पावसामुळे पूर्ण झाला नाही, तर राखीव दिवस सोमवारी, 3 नोव्हेंबरला ठेवण्यात आला आहे. मात्र सोमवारीही नवी मुंबईत 55 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर दोन्ही दिवस पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना संयुक्त विजेते (Joint Winners) घोषित करण्यात येईल.

भारताची संभाव्य Playing XI:

स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा/राधा यादव, क्रांती गौड, श्रीचरणी, रेणुका ठाकूर

दक्षिण आफ्रिकेची संभाव्य Playing XI:

लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, सुने लुस, अनेके बॉश/मसाबता क्लास, ॲने डेर्कसेन, मारिजान कॅप, सिनेलो जाफ्ता (विकेटकीपर), क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा.

भारताचा संपूर्ण संघ- (Team India Full Squad)

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष, रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा,  क्रांती गौड, श्री चरणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, उमा छेत्री, शेफाली वर्मा.

दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ- (South Africa Full Squad)

लार्वर वोलवर्ड (कर्नाधर), अयाबोंग खाका, क्लो ट्रेऑन, नादिन डी क्लार, मेरी कॅप, टाझमिन कॅप, ताझमिन कॅप, सिनालो जाफ्ता, नानकुला डार्क, ॲनी डेकल्प, ॲनेकॉन डार्क, ॲनेकॉन डार्कसेन, मस्सा, मस्सा, मस्सा.

आतापर्यंत महिला क्रिकेट विश्वचषक जिंकलेल्या संघांची यादी- (Women World Cup Winner List)
















वर्ष विजेता उपविजेता
१९७३ इंग्लंड ऑस्ट्रेलिया
१९७८ ऑस्ट्रेलिया इंग्लंड
१९८२ ऑस्ट्रेलिया इंग्लंड
१९८८ ऑस्ट्रेलिया इंग्लंड
१९९३ इंग्लंड न्यूझीलंड
१९९७ ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड
२००० न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया
२००५ ऑस्ट्रेलिया भारत
२००९ इंग्लंड न्यूझीलंड
२०१३ ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज
२०१७ इंग्लंड भारत
२०२२ ऑस्ट्रेलिया इंग्लंड

संबंधित बातमी:

IND vs SA Final Live Streaming : फ्री, फ्री, फ्री…. येथे फुकटात पाहू शकता भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम महामुकाबला, जाणून घ्या सविस्तर माहिती

आणखी वाचा

Comments are closed.