दुखापतीनंतर धमाका करण्यासाठी पठ्ठ्या सज्ज! फिटनेस टेस्ट पास, BCCI टी-20 संघात देणार संधी


दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारताचा T20I संघ: दक्षिण आफ्रिका विरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेदरम्यान टीम इंडियासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा पूर्ण फिट झाला असून मैदानात धमाका करण्यास तयार आहेत.

बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये हार्दिकने आपला बॉलिंग फिटनेस टेस्ट यशस्वीरीत्या पार केला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत हार्दिकची उपस्थिती जवळपास निश्चित झाली आहे. त्याआधी तो सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतही बॅट-बॉल दोन्हीने कमाल करताना दिसणार आहे.

टीम इंडियासाठी मोठा दिलासा

पीटीआयच्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्याला (Hardik Pandya Fitness) बीसीसीआयकडून पुन्हा मैदानात उतरण्याची ग्रीन सिग्नल मिळाला आहे. बॉलिंग टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला असून, प्रोटियाजविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला पाहणे निश्चित मानले जात आहे.

आशिया कप 2025 दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे हार्दिक दीर्घ काळ टीम इंडियापासून दूर होता. याच कारणामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्याचाही भाग होऊ शकला नव्हता. मात्र आता तो सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत उतरून आपली लय परत मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पांड्याची खराब कामगिरी

हार्दिकचा टी-20 फॉरमॅटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रेकॉर्ड फारसा चांगला नाही. आतापर्यंतच्या 12 डावांतून त्याच्या बॅटमधून 231 धावा आल्या आहेत आणि स्ट्राईक रेटही केवळ 121 राहिला आहे. गोलंदाजीत त्याने 11 बळी घेतले आहेत. तरीही, मागील काही महिन्यांतील हार्दिकची फॉर्म अफलातून आहे. 2024 मधील टी-20 विश्वचषक जिंकण्यात त्याची भूमिका निर्णायक होती. गेल्या वर्षभरात त्याने अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. त्यामुळे कमबॅकनंतरही टीम मॅनेजमेंटला हार्दिककडून तशाच दमदार कामगिरीची अपेक्षा असेल.

हे ही वाचा –

India vs South Africa 1st ODI : रोहित अन् गंभीर बोलत राहिले, विराट कोहली न थांबता रुममध्ये निघून गेला; हॉटेलच्या लॉबीमध्ये नेमकं काय घडलं?, VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.