क्रिकेटप्रेमींना धक्का; भारत-पाकिस्तान मॅच रद्द होण्याची शक्यता, एजबेस्टनमधून वाईट बातमी, नेमकं
भारत चॅम्पियन्स वि पाकिस्तान चॅम्पियन्स: भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर तणावपूर्ण झाले होते. काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे हे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर येतील की नाही, यावर संशय होता. मात्र आता क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे, दोन्ही संघ पुन्हा मैदानात आमनेसामने येणार आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025 (WCL 2025) या स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली असून, ही स्पर्धा 2 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये भारत, पाकिस्तानसह एकूण 6 संघ सहभागी झाले आहेत.
20 जुलैला भारत चॅम्पियन्स विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स सामना
हा बहुचर्चित सामना 20 जुलै रोजी एजबॅस्टन मैदानावर होणार आहे. पाकिस्तानचा हा दुसरा सामना असणार आहे, तर भारतीय संघाचा हा पहिलाच सामना असेल. पण, या सामन्यावर पावसाचे संकट घोंगावत आहे. AccuWeather च्या अंदाजानुसार 20 जुलै रोजी एजबॅस्टनमध्ये 55% पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग सुमारे 18 किमी/ताशी असेल आणि आर्द्रता 64% पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तापमान सुमारे 22 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे सामना रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज, 19 जुलै रोजी इंग्लंड चॅम्पियन्स आणि ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स यांच्यात देखील सामना एजबॅस्टनमध्येच होणार आहे. पण हवामान खात्याच्या माहितीनुसार आज पावसाची 100% शक्यता आहे.
🇮🇳 इंडिया विरुद्ध पाकिस्तान – क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा परत आली आहे – आणि हे फक्त 3 दिवसांत घडत आहे! Ununsunday सुन्डे, 20 जुलै – महापुरूष 2025 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दंतकथा धडकली! 🏏💥
मर्यादित जागा शिल्लक आहेत – मेकिंगमध्ये इतिहास गमावू नका! Your आता आपली तिकिटे बुक करा! pic.twitter.com/sajcsrg5gq– वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (@Wclleag) 16 जुलै, 2025
पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज थरार?
गेल्या हंगामात भारतीय संघाने पाकिस्तानला अंतिम फेरीत हरवून जेतेपद जिंकले होते. यंदाही भारतीय संघाचे नेतृत्व युवराज सिंग करत आहेत, तर पाकिस्तान संघाची धुरा मोहम्मद हफीजकडे आहे.
भारत चॅम्पियन्स : शिखर धवन, सुरेश रैना, अंबाती रायुडू, गुरकीरत मान, युवराज सिंग (कॅप्टन), युसुफ पठाण, स्टुअर्ट बिन्नी, इरफान पठाण, रॉबिन उथप्पा, हरभजन सिंग, पीयूष चावला, विनय कुमार, सिद्धार्थ कौल, अभिमन्यू मिथुन, वरुण आरोन.
पाकिस्तान चॅम्पियन्स : मोहम्मद हाफिज (कर्णधार), कामरान अकमल, शोएब मलिक, शारजिल खान, आसिफ अली, ओमर अमीन, आमिर यमेन, वहाब रियाज, सोहेल खान, सोहेल तनवीर, रम्मन रायस, शाहिदी आफ्रिदी, शाहिदी आफ्रिदी, इमाद, फर्मद, सारा युनिस अहमद, मिसबा-उल-हक, अब्दुल रझा, सईद अजमल.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.