भारताचा हा खेळाडू ठरणार न्युझीलंडसाठी घातक , ठोकलेत सर्वाधिक षटकार!!
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. तसेच भारतीय संघाशिवाय अ गटामधील न्युझीलंड संघ सुद्धा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. तत्पूर्वी दोन्ही संघांना 2 मार्च रोजी सामना खेळायचा आहे आणि हा गटातील शेवटचा सामना असेल. भारत – न्यूझीलंड 2 मार्च रोजी दुबईच्या स्टेडियमवर समोरासमोर असतील. तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडचा पराभव करून स्पर्धेमध्ये त्यांचे स्थान टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. त्याचबरोबर मिचेल सैंटनरच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघ सुद्धा उपांत्य फेरीपूर्वी सामना जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरेल.
भारत न्यूझीलंड वनडे सामन्यादरम्यान कोणत्या संघाच पारडं जड राहील आहे ? तसेच न्यूझीलंड विरुद्ध वनडे फॉरमॅटमध्ये भारताच्या कोणत्या फलंदाजाने सगळ्यात जास्त षटकार ठोकले आहेत ते जाणून घेऊया.
वनडे फॉरमॅटमध्ये न्युझीलंड विरुद्ध सगळ्यात जास्त षटकार ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीमध्ये विराट कोहली टॉपच्या स्थानी आहे. विराट कोहलीने न्यूझीलंड विरुद्ध 31 वनडे सामन्यांमध्ये 95.69 च्या स्ट्राईक रेटने आणि ५८.७५ च्या एवरेजने 1719 धावा केल्या आहेत. त्यादरम्यान त्याने 146 चौकार आणि 24 षटकार ठोकले आहेत. तसेच विराट कोहलीची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम खेळी 154 धावा नाबाद अशी आहे. हे आकडे सांगतात की जर विराट कोहली चांगला खेळला तर न्यूझीलंड संघासाठी घातक ठरू शकतो.
भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांत वनडे फॉरमॅट मध्ये कोणत्या संघाच पारडं जड आहे? दोन्ही संघांमधील रेकॉर्ड काय सांगतात ते जाणून घ्या, तर हे आकडे सांगतात की वनडे फॉरमॅटमध्ये भारत आणि न्यूझीलंड 118 वेळा समोरासमोर आले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला 60 सामन्यात पराभूत केले आहे. तसेच भारतीय संघाविरुद्ध न्यूझीलंडला 50 सामन्यात विजय मिळाला आहे. याशिवाय 7 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. तसेच दोन्ही संघांमध्ये एक बरोबरीचा सामना झाला आहे.
हेही वाचा
चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान संघाचा मोठा निर्णय, या दिग्गजाला दिली मेंटॉरची जबाबदारी!
“रोहित शर्माला विश्रांती? न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघात मोठा बदल संभव!”
‘आम्हाला कमी समजू नका…’, अफगाण प्रशिक्षक जोनाथन ट्रॉटचा ऑस्ट्रेलियाला इशारा
Comments are closed.